म्हसवड पोलिसांची निवडणूकपूर्व कडक कारवाई: उपद्रवी व अवैध धंद्यांवर कडक कारवाई

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड:

आगामी विधानसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलीस ठाण्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. प्रभारी अधिकारी सपोनि बिराजदार आणि सर्व बिट अंमलदारांनी एकत्रितपणे उपद्रवी व अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत 112 उपद्रवी व्यक्तींना तडीपार करण्यात आले असून, BNSS कायद्याअंतर्गत 126 प्रमाणे 70 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी 477 जणांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा कायद्यानुसार कलम 168 अन्वये कडक कारवाई करण्यात आली आहे.

अवैध दारू व्यवसायावर धडक:
अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्धही कडक कारवाई करण्यात आली आहे. 19 प्रकरणांमध्ये 4,500 लिटर दारू जप्त करण्यात आली असून, आरोपींवर मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 93 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रस्त्यावरील गैरवर्तनाविरोधात कठोर भूमिका:
रस्त्यावर आरडाओरडा करणारे आणि सामान्य नागरिकांवर दबाव आणणाऱ्या 20 हून अधिक व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

म्हसवड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रयत्न निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शक आणि शांततामय व्यवस्थापनासाठी प्रशंसनीय ठरत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!