म्हसवड पोलीसांचा अवैध दारूविक्रीवर धडाकेबाज छापा – २ लाखांचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, प्रतिनिधी —
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारूविक्रीविरोधात कारवाईचे सत्र सुरूच असून नुकत्याच पळशी गावातील ग्रामसभेत पारित झालेल्या दारूबंदी ठरावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पळशी परिसरातील वाघजाई ढाब्याच्या आडोशाला, तसेच देवापूर, कारखेल (कासारवाडी फाटा) येथे धाड टाकून तब्बल ₹1,68,975 किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी ग्रामसभेतील ठरावाला भीक न घालता काहीजण अवैधरीत्या दारू विक्री करत असल्याची माहिती सपोनि अक्षय सोनवणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी धडक कारवाई करुन पळशी पिंपरी हद्दीतील वाघजाई ढाब्याच्या मागील बाजूस, तसेच देवापुर, कासारवाडी फाटा (कारखेल) येथे छापे टाकले.
या कारवाईत देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व इतर साहित्य असा एकूण ₹1,68,975 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात खालील आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:
1. धैर्यशील वामन खाडे (वाघजाई ढाबा)
2. विक्रम संभाजी गायकवाड
3. वैभव बाबुराव बाबर
4. हनुमंत पांडुरंग चव्हाण
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईस सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, धीरज कवडे, राहुल थोरात, श्रीकांत सुद्रिक, भामाताई काळे, कोमल काळे आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमधून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारच्या कठोर कारवायांचे संकेत देण्यात आले आहेत.