म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील म्हसवड ता. माण गावातुन मोटार सायकली चोरीचे गुन्हे दाखल होते. सदर गुन्ह्यांतील आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, सोो, सातारा समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा, श्रीमती आँचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी सो,, दहिवडी उप विभाग, श्रीमती अश्विनी शेंडगे यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्ह्यांचे तपासात वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. सखाराम बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व पोलीस उपनिरीक्षक, श्री. अनिल वाघमोडे व अंमलदार यांनी सदर घडलेल्या गुन्ह्यांबाबत गोपनिय खबऱ्यामार्फत व तांत्रिक माहीतीचे आधारे आरोपी निष्पन्न केले.
दिनांक 17/05/2024 रोजी यातील आरोपीचा ठावठिकाणा मिळताच मा. वरिष्ठ अधिकारी साो यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सखाराम बिराजदार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, श्री. अनिल वाघमोडे व अंमलदार यांनी सोलापुर जिल्ह्यांतील माळशिरस, अकलुजव इंदापुर बावडा येथे जावून आरोपी १) राहुल वामन शिताप कोळी, रा. कचरेवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर, २) अजय उर्फ पद्या प्रकाश खरात, रा. कचरेवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर, व ३) आकाश बाळु थोरात, रा. चाकण ता. खेड जि. पुणे सध्या रा. कोंडबावी ता. माळशिरस जि. पुणे ताब्यात घेवून आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी संगनमताने म्हसवड गावचे हद्दीतील दोन मोटार सायकल व पिलीव ता. माळशिरस गावचे हद्दीतल एक मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी यांनी चोरी केलेल्या तीन मोटार सायकली एकुण 1,00,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केरण्यात आला आहे.
आरोपी यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचे हद्दीतील दोन गाड्या व पिलीव ता. माळशिरस येथुन चोरी केलेली गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक , सातारा श्री. समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा, श्रीमती.आँचल दलाल, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी , दहिवडी विभाग, दहिवडी श्रीमती अश्विनी शेंडगे, यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक, अनिल वाघमोडे, व अमंलदार शहाजी वाघमारे, शिवाजी जाधव, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, व धिरज कवडे यांनी केली असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अमंलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंद केले.