म्हसवड नगरपरिषद निवडणूक 2025 — जाहीर प्रचारबंदीबाबत निवडणूक प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसवड दि. 28 नोव्हेंबर
म्हसवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने प्रचारबंदीच्या कालावधीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित आदेश प्राप्त झाला असून त्यानुसार संबंधित बदलांची माहिती निवडणूक प्रशासनाने अधिकृतरित्या प्रसिद्ध केली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माहितीनुसार, मा. राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ/ग्रापपंनि-2025/प्र.क्र.17/का-6 दि. 27/11/2025 नुसार आचारसंहितेतील मुद्दा क्र. 6 मधील (2) बाबत सुधारणा करण्यात आली आहे.

१ डिसेंबर रात्री १० वाजेपासून प्रचारबंदी लागू

मतदानाची तारीख २ डिसेंबर असल्याने, १ डिसेंबर रोजी रात्री १०.०० वाजेपासून सर्व प्रकारचा प्रचार पूर्णपणे बंद राहणार आहे.
यामध्ये पुढील सर्व गोष्टींचा समावेश आहे –

  • सभा व मोर्चे
  • ध्वनिक्षेपकाचा वापर
  • निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिराती, प्रसिध्दी व प्रसारण

सदर नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश सर्व उमेदवार व पक्षांना देण्यात आले आहेत.

२ डिसेंबर रोजी मतदान — सकाळी ७.३० ते सायं. ५.३०

राज्य निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. रानिआ/निका/नप-2025/प्र.क्र.14/का-6 दि. 04/11/2025 नुसार जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मंगळवार, दिनांक 02/12/2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

— डॉ. सचिन माने,
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी,
म्हसवड नगरपरिषद


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *