म्हसवड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी डॉ. सचिन माने यांची फेर नियुक्ती
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी डॉ. सचिन माने यांची फेर नियुक्ती झाली असुन या पदाचा सोमवार दि. 30 रोजी त्यांनी पदभार स्विकारला आहे, त्यांनी पदभार स्विकारताच सर्वात प्रथम माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी त्यांचे अभिनंदन केले. व त्यांना शुभेच्छा दिल्या
प्रशासनातील सिंघम अशी प्रतिमा असलेल्या डॉ. माने यांची म्हसवड पालिकेतुन मुंबई (भिवंडी) महापालिकेत गत 5 महिन्यांपुर्वी बदली झाली होती, तेव्हापासुन म्हसवड पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून तात्पुर्ता चार्ज हा वडुजचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्याकडे सोपवण्यात आला होता. माण तालुक्यातील सर्वात मोठी व जुनी असलेल्या पालिकेत प्रशासकीय राजवट सुरु असताना देखील येथे प्रभारी मुख्याधिकारी देण्यात आल्याने म्हसवड पालिकेतील शहरातील विविध विकासकामे रखडली होती,
डॉ. माने यांनी यापुर्वी म्हसवड पालिकेत मुख्याधिकारी म्हणुन काम करताना अनेक धाडसी निर्णय घेतल्याने त्यांची प्रशासनातील सिंघम अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यांची शहरातुन बदली झाल्यानंतर अनेकांनी आनंदोत्सवही साजरा केला होता, तर सर्वसामान्यांनी अश्रु ढाळले होते. मुख्याधिकारी म्हणुन काम करताना डॉ. माने यांनी शहरातील अतिक्रमणावर प्रशासकीय हातोडा मारल्याने शहर अतिक्रमण मुक्त बनले होते, त्यांची बदली झाल्यावर काही ठिकाणी पुन्हा ते पूर्ववत झाल्याचे चित्र दिसु लागले असताना आता पुन्हा पालिकेत मुख्याधिकारी म्हणुन ते रूजु झाल्याने अतिक्रमण धारकांनी चांगलाच धसका घेतल्याचे चित्र शहरात दिसत आहे. तर पालिकेत मुख्याधिकारी नसल्याने शहरातील विविध विकासकामे रखडली होती, ती विकासकामे आता सुरु होतील अशी अपेक्षा सर्वसामान्य म्हसवडकर जनता करीत आहे. पुढील महिन्यात (डिसेंबर) येथील ग्रामदैवत असलेल्या श्री. सिध्दनाथाचा रथोत्सव संपन्न होत आहे, ही यात्रा प्रशासन कशी हाताळेल अशी चिंता सर्वांना वाटत होती मात्र आता सर्वांना वाटत होती मात्र आता मुख्याधिकारी म्हणुन डॉ. माने यांनी पदभार स्विकारल्याने यात्रा प्रशासन व्यवस्थित हाताळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान म्हसवड पालिकेत मुख्याधिकारी म्हणुन पदभार स्विकारताच डॉ. सचिन माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी यापुढे आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार असुन जी कामे अपुरी राहिली आहेत ती पुर्ण करण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार आहे. नागरीकांनीही प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे