म्हसवड नगरपरिषदेचे गाळयामध्ये पोट भाडेकरु ठेवलेने तसेच मुळ असलेले गाळे फोडून दोन गाळयांचा एकच गाळा बनविलेने संबंधीत मुळ भाडेकर यांचे भाडेकरार रदद करुन पुन्हा त्या गाळयांचा लिलाव काढण्यात यावा याकरीता रिपब्लीकन सेना जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील दत्तात्रय भोकरे, यांनी म्हसवड नगरपालिकेसमोर दि २९ पासुन आमरण उपोषण सुरु केले आहे उपोषणाचा आज तीसरा दिवस असून अद्याप त्यांच्या मागण्याची दखल मुख्याधिकारी यांनी घेतली नाही
मुख्याधिकारी नगर परिषद म्हसवड यांना रिपब्लीकन सेना जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील दत्तात्रय भोकरे, यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे म्हसवड नगरपरिषदेने अनेक गाळे भाडे कराराने व्यवसायासाठी दिलेले होते व आहेत. परंतु असे असताना नगरपरिषेदेने ज्या लोकांना ज्या व्यवसायासाठी गाळे भाडे कराराने दिलेले आहेत त्या गाळयामध्ये सध्या ब-याच मुळ भाडेकरूंनी पोट भाडेकरु ठेवलेले आहेत. तसेच जो गाळा ज्या व्यवसायासाठी भाडेकराराने दिलेला आहे तो व्यवसाय त्या गाळयामध्ये न करता पोटभाडेकरु अन्य कोणतातरी व्यवसाय बेकायदेशिरपणे करीत आहेत. तसेच ज्या लोकांनी पोट भाडेकरु ठेवले आहेत ते त्या पोट भाडेकरु कडून अमाप असे भाडे वसूल करीत आहेत. तसेच काही भाडेकरूंनी नगरपरिषदेचे गाळे हे स्वतःची मालमत्ता असल्यासारखे दोन गाळयांचे मधील भिंत फोडून काढून दोन गाळयांचा एकच गाळा बनवून राजरोषपणे व्यवसाय करीत आहेत. व पोट भाडेकरु ठेवले आहेत.
वास्तविक पाहता म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांनी या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन ज्या गाळयांमध्ये मुळ भाडेकरु करारामध्ये नमूद असलेला व्यवसाय करीत नसतील किंवा जर एखादया मुळ भाडेकरुने पोट भाडेकरु ठेवला असेल तर त्यांचे भाडेकरार तात्काळ रदद करुन ते गाळे नगरपरिषदेच्या ताब्यात घेऊन त्या गाळयांचा पुन्हा लिलाव काढणेत यावा. तसेच गरीब, गरजू व होतकरु तसेच सुशिक्षीत बेकार, अपंग अशा लोकांना सदरचे गाळे लिलावामध्ये भाड्याने देणेत यावेत. तसेच नगर परिषदेने जो गाळा ज्या व्यवसायासाठी भाड्याने दिला आहे त्या गाळयामध्ये तोच भाडेकरु तोच व्यवसाय करीत आहे का याची पाहणी तात्काळ करणेत यावी व ज्यांनी पोट भाडेकरु ठेवले असतील किंवा गाळयांच्या भिंती पाडून दोन गाळयांचा एकच गाळा बनविला असेल अशा सर्व भाडेकरूंचे भाडेकरार ता. २४/१/२०२४ रोजीपर्यंत रदद करणेत यावेत व नगरपरिषद कार्यालय, म्हसवड चे समोर ता.२९/१/२०२४ रोजीपासून अमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिले होते
वर दिलेल्या निवेदनाप्रमाणे मुख्याधिकारी यांनी दखल घेतली नाही म्हणून स्वप्निल भोकरे यांनी दि २९ पासून नगरपालीके समोर उपोषणाला बसले आहे उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही