गणेश मंडळांनी देखावे सादर करताना कोणत्याही जाती, धर्माच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी:अश्विनी शेंडगे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
गणेशोत्सव काळात सातारा पोलीस दलाने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन सर्वच गणेश मंडळांनी करावे, याबरोबच सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे सादर करताना कोणत्याही जाती, धर्माचा भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी केले आहे.
म्हसवड येथे पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या बैठकीत त्या बोलत होत्या, यावेळी माणचे तहसिलदार सचिन अहिर, स.पो.नि. राजकुमार भुजबळ, सर्व पोलीस पाटील, शांतता समिति सदस्य, नगरपालिका म्हसवड यांचे प्रतिनिधी लोखंडे उपअभियंता म.रा.वि.वि. महामंडळ म्हसवड यांचे प्रतिनिधी, डॉ. देशमुख, डॉ. काकडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड सार्वजनिक बांधकाम विभाग प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शेंडगे यांनी सांगितले की गणेश उत्सव हा पवित्र सण असून या सणाचे पावित्र्य राखण्यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करावे तसेच मंडळातील पदाधिकारी यांनी गणेशोत्सव काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची बॅनरबाजी करू नये व गणेश उत्सव काळामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करावी. आणि काळजी घेऊन गणेश उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करावा जातीय तेढ निर्माण करणारी बॅनरबाजी न करता अश्लील गाणी न लावता गणेश उत्सव काळामध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजाला नवीन दिशा देण्यासाठी गणेश उत्सवामध्ये मंडळांनी प्रयत्न करूनगणरा उत्सव साजरा करावा. शासनाने घालून दिलेले आणि नियमांचे पालन करून गणेश उत्सव काळामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबवावे. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या गणेश उत्सव मंडळांवर व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे यावेळी त्यांनी सांगितले.
सोशल मीडिया वरून जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज अथवा पोस्ट करू नये तसेच गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेऊन अधिकृत वीज कनेक्शन घेऊन शासन नियमांचे पालन करावे. असेही त्या म्हणाल्या.
यावेळी म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय राजकुमार भुजबळ यांनी गणेश उत्सव साजरा करताना शासन नियम पालन करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी म्हसवड व ग्रामीण भागातील गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार उपविभागीय अधिकारी अश्विनी
शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित असणाऱ्या गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या वतीने म्हसवड शहरात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एपीआय राजकुमार भुजबळ यांचा सत्कार म्हसवडकर यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे यांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आलेल्या सूचनांचे निराकरण या वेळेला उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.
म्हसवड व ग्रामीण भागामध्ये सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या गणेश मंडळाला सालाबाद प्रमाणे गणराया अवार्ड देण्यात येणार असल्याचे राजकुमार भुजबळ यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सोनवले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हसवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी अभिजीत भादुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
गणेशोत्सव अनुषंगाने शासनाने दिलेल्या नियमाबाबत मार्गदर्शन करून खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
1) गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी मा. धर्मादाय आयुक्त, सातारा यांच्याकडे मंडळाची नोंद करणे.
2) परवानगी करीता ऑनलाइन अर्ज करावेत.
3) पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गाने व ठरवून दिलेल्या वेळेतच गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक काढावी.
4) जिवंत देखावे करणे करिता पोलीस स्टेशनची वेगळी परवानगी घ्यावी.
5) कोणत्याही जाती धर्माच्या, व्यक्तीच्या भावना दुखवतील असे देखावे, पोस्टर, बॅनर लावू नये.
6) गणेश मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी महिलांची किंवा मुलींची छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी. कार्यक्रम ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत
7) सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही बसावेत.
8) सर्वच गणेश मंडळांनी डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा.
9) ध्वनी प्रदूषण नियमाचे पालन करावे.
10) गणेशोत्सव कालावधी मध्ये गणेश मूर्तीच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी संबंधित मंडळाची राहीलयाची नोंद घ्यावी.
11) पावसाचे दिवस असल्यामुळे मूर्तीचे संरक्षण करणे करिता मंडपात फक्त पडदे न बसवता पत्र्याचा वापर करावा.
12) लाइट बसवणे करिता MSEB यांची परवानगी घ्यावी व इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटहोऊ नये याकरिता गणेश मंडळांनी विद्युत पुरवठा व्यवस्थित असलेबाबत MSEB चे प्रमाणपत्र प्राप्त करावे. 13) वर्गणी जबरदस्तीने गोळा करू नये. वर्गणीसाठी कोणासही सक्ती करू नये. 14) मंडपामध्ये 24 तास एक स्वयंसेवक हजर ठेवावा व मंडपात 10 दिवसाच्या काळात कोणीही अवैधकृती करु नये. व्हिजीट बुक ठेवावे.
15) हिंदू व मुस्लीम या धर्माचे सण एकाच वेळी येत असल्याने दोन्ही समुदायाने समभावाने, गावात एकोपा राहील या भावनेने वागावे.
16) देखाव्यामुळे सामाजिक ऐक्यास बाधा येणार नाही असे देखावे ठेवावेत इत्यादी सुचना दिल्या.
तसेच उत्सव दरम्यान रक्तदान शिबिर घेणे, वीर माता पिता, वीर पत्नी, माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक यांना आरतीला
नानक, स्वातंत्र्य सैनिक यांना आरतीला मान देणे, एक गाव एक गणपती उपक्रम, गाव स्वच्छता मोहीम राबविणे, वृद्धाश्रमांना मदत करणे, वृक्षारोपण करणे, गरजू मुलांना वही – पुस्तक वाटप करणे, गावामध्ये मंडळामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे असे उपक्रम राबविण्यासाठी आवाहन करण्यात आले.
चौकट – गणेश मंडळांसाठी एक खिड़की योजना सुरु – तहसिलदार अहिर- यावेळी माणचे तहसीलदार सचिन अहिर यांनी मंडळाच्या गैरसोयी लक्षात घेऊन सर्व गणेशोत्सव मंडळांना एकच एकाच ठिकाणी सर्व परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे अशी माहिती देत सदर योजनेतुन तालुक्यातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी रितसर परवाने घ्यावेत असे आवाहन केले.