म्हसवड येथील हायवे रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम निकृष्ट.

बातमी Share करा:

  म्हसवड. .
        म्हस वड येथे सुरू असणारे सातारा पंढरपूर हायवे अंतर्गत चे रस्ता कॉंक्रिटीकरण बांधकाम अत्यंत निकृष्ट स्वरूपात सुरू असून या कामावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण  नसल्याने ठेकेदाराने मनमानी सुरू केल्याची लेखी तक्रार राज्य किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी सातारा यांच्या कडे केली आहे.
याबाबतचे सविस्तर लेखी निवेदन प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व जिल्हाधिकारी सातारा यांना पाठविले आहे.या निवेदनात रस्त्याच्या निकृष्ट कामाचा तपशील दिलेला आहे.
      सातारा पंढरपूर या राज्य महामार्ग क्रमांक 141 च्या कामाचा शुभारंभ अंदाजे सहा वर्षांपूर्वी झाला.आजही अनेक ठिकाणी या रस्त्याचे काम रखडलेल्या स्वरूपात आहे.मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जनतेतून उठाव झाल्याने म्हसवड शहरा नजीकचे ठप्प असणारे काम नुकतेच सुरू झाले.सदर काम वेळेत व दर्जेदार झाले पाहिजे ही तमाम जनतेच्या अपेक्षा आहे.गत काही कालावधीत रस्ता अर्धवट उकरून ठेवल्यामुळे ,तसेच धुळीच्या साम्राज्यामुळे स्थानिक रहिवासी व प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला हे सर्वांनाच माहित आहे. प्रलंबित काम सुरू झाल्याने जनतेत उत्साह निर्माण झाला मात्र या कामावर कोणाचा अंकुश आहे की नाही? हा प्रश्न या कामाच्या दर्जावरून उपस्थित होत आहे.
      म्हसवड शहर हद्दीत सुरू असणारे काम अत्यंत निकृष्ट स्वरूपात सुरू असलेले दिसून येत आहे.वास्तविक पाहता या रस्त्याचे काँक्रिटीकरण पेवर व इतर अत्याधुनिक मशनरीने होणे अपेक्षित असताना सुद्धा ठेकेदाराने सदर काँक्रिटीकरण मॅन्युअली स्वरूपात केलेली आहे.याकडे कोणत्याही शासकीय  यंत्रणेचे सुपरव्हिजन दिसून येत नाही. ठेकेदार व त्यांचे कामगार हेच या कामाचे सर्वस्व असल्याचे दिसून येत आहे.काम सुरू असताना शासकीय यंत्रणेचा कोणताही अधिकारी किंवा  प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने कामावर  कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.
 सदर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण मशनरी ऐवजी मॅन्युअली होत असल्याचे  दिसून येताच उपस्थित कर्मचाऱ्यांना त्याबाबत विचारणा केली असता पेवर मशीन बंद असल्याने काम कामगाराद्वारे करीत असल्याचे सांगितले. त्यानुसार ठेकेदार प्रतिनिधी
सत्यनारायण  व  नागेश्वर राव यांच्याकडे विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली.काहीसे खडे बोल सुनावल्यानंतर त्यानी आपली चूक मान्य केली मात्र काम तसेच  चालू ठेवले.वास्तविक पाहता रस्त्याचे काम मशनरीने न झाल्यामुळे रस्त्याचा कॉम्पॅक्टपणा कमी राहात असून  सम पातळी सुद्धा एक सारखी राहत नसल्याचे  दिसून आले.
 या काँक्रीटीकरण्याच्या कामांमध्ये दोन थर असून खालच्या थरा मध्ये वापरण्यात येणारे सिमेंट हे सुमार दर्जाचे असून दुसऱ्याच दिवशी सदर काम निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे.काँक्रिटीकरणामधील  सिमेंटचा अक्षरशा धुरळा उडताना दिसत आहे. कॉंक्रिटीकरण झालेल्या कामावर नियमित पाणी मारणे गरजेचे असताना सुद्धा केवळ टँकरचा दिखाऊपणा तसेच या व इतर सर्व बाबीमुळे
रस्त्याच्या कामाची ऐसी तैसी मध्ये गोलमाल असल्याचे स्पष्ट होत आहे.सदर रस्ता म्हसवड , पंचक्रोशी तसेच हायवे म्हणूनअत्यंत महत्त्वाचा असून हे काम वरचेवर होणारे नाही याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. याकरिता शासकीय यंत्रणेने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी नी  सुद्धा या कामावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे,अन्यथा मागचे दिवस पुढे येण्याला वेळ लागणार नाही,रस्त्याच्या अर्धवट कामामुळे म्हसवड करांना गेले वर्षभरात प्रचंड त्रास सहन करावा लागलेला आहे .ठेकेदार काम करतोय म्हणजे उपकार करत नाही.
      सदर रस्ता काँक्रिटी करण्याचे काम मशीनद्वारे करावे, सिमेंट व इतर मटेरियल चा दर्जा चांगला असावा,
केलेल्या कॉंक्रिटीकरण कामावर नियमितपणे पुरेशा प्रमाणात पाणी मारावे.तसेच या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्याची उपस्थिती गरजेची असल्याची मागणी प्रा .विश्वंभर बाबर यांनी निवेदनात करण्यात आलेली आहे.
मशनरीचा वापर न करता तसेच निकृष्ट मटरेल चा वापर करून केलेल्या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदारावर  कारवाई करावी अशी मागणी प्रा.बाबर यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!