माऊली फाउंडेशन मुंबई यांचे मार्फत इंजि सुनील पोरे यांचा सामाजिक कार्याची नोंद घेऊन फलटण येथे झी टॉकीजवरील गजर कीर्तनाच्या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे हस्ते शाल ,पुष्पगुच्छ मानचिन्ह देऊन सन्मान केला
काळबादेवी मुंबई येथील सामाजिक कार्य करणारी संस्था असुन असंख्य मुंबई व परिसरात सामाजिक उपक्रम राबवीत असते त्यातीलच एक म्हणजे आनंदी ते पंढरपुर पायी वारी करणारे वारकऱ्यासाठी मोफत भोजन मसाज व औषधोउपचार करतात वारीतील सुमारे पन्नास हजार वारकरी याचा लाभ घेतात
या दरम्यान ही संस्था समाजसाठी कार्य करणाऱ्याचा व्यक्ती ,संस्था यांचे सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान करतात त्यानुसार इंजि सुनील पोरे यांनी केलेले सामाजिक कार्य जसे मोफत रुग्णवाहिक,दिंडीसाठी भोजन ,कोरोना काळातील कार्य,आर्सेनिक अल्बम गोळी वाटप,रक्तदान शिबिर,नेत्र शिबीर,आरोग्य शिबिर,विविध खेळाचे सामने, उत्सव मंडळास मदत आदी सामाजिक कार्याची नोंद घेऊन माऊली फाउंडेशन मुंबई यांनी फलटण येथील कार्यक्रमात झी टॉकीजवरील गजर कीर्तनाच्या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे शाल ,पुष्पगुच्छ मानचिन्ह देऊन सन्मान केला
यावेळी संस्था अध्यक्ष डॉ शिंगण,उद्योगपती इंगळे ,हायकोर्ट वकील विश्वनाथ टाळकुटे आदिसह माऊली फाउंडेशन मुंबईचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येन उपस्थित होते