वयोवृद्ध पित्याला मुलांकडून मारहाण — म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी) –
जांभुळणी (ता. माण) येथील ८७ वर्षीय जगु शेबा काळेल या वृद्ध व्यक्तीवर स्वतःच्या दोन मुलांकडून मारहाण व दुर्लक्ष केल्याची तक्रार म्हसवड पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक व पालक संरक्षण कायदा 2007 आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता, जगु शेबा काळेल हे आपल्या घराच्या अंगणात बसले असताना मुलगा भिकु जगु काळेल यांनी बाजरी वाळवण्यासाठी प्लास्टिकचा कागद आणण्यासाठी पैसे मागितलेअसता. वृद्ध पित्याने सांगितले की “मी स्वतः तुझ्यासोबत येतो”, यावरून भांडण झाले आणि भिकु यांने वडिलांना शिवीगाळ करून हाताने-पायाने मारहाण केली.

त्यानंतर “पैसे नाही दिले तर मी तुला मारहाण करीन” अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे. मोठा मुलगा ईश्वर जगु काळेल हा देखील पित्याची काळजी घेत नसल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.

🔹 वृद्ध पित्याची तक्रार :

“मी म्हातारा असूनही माझी मुलं माझी काळजी घेत नाहीत, राहण्याची-खाण्याची सोय करत नाहीत. माझे जगणे फार कठीण झाले आहे. त्यामुळे मी पोलिसांत तक्रार दिली,” असे ८७ वर्षीय जगु काळेल यांनी सांगितले.

🔹 पोलिसांची माहिती :

हा गुन्हा दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.14 वाजता (14.14) म्हसवड पोलीस स्टेशन येथे नोंदवला गेला. तपास पोलीस हवालदार आर. के. फडतरे (मो. 9763485945) हे करत आहेत. भेट देणारे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे (मो. 9970717712) यांनी वृद्धाची भेट घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

संपादकीय टीप :
वृद्ध पालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समाजासाठी लज्जास्पद आहेत. अशा तक्रारींवर पोलिसांनी त्वरीत आणि संवेदनशीलतेने कारवाई करणे गरजेचे आहे, जेणेकरून इतर वृद्ध पालकांनाही न्याय मिळेल.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *