म्हसवड येथे”दलित पँथर संघटनेच्या लढ्याला यश” : प्रमोद लोखंडे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड 
दलित पँथर संघटनेच्या वतीने मा.प्रमोद नंदकुमार लोखंडे यांनी म्हसवड नगरीतील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात   नगरपालिकेसमोर सुरु केलेले आमरण उपोषण लढ्याला यश आले असून मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर हे आमरण उपोषण  स्थगीत करण्यात आले 
म्हसवड शहरातील  ८ ते १० दिवसांतून एक वेळा होणाऱ्या विस्कळीत व अस्वच्छ पाणी पुरवठ्याबाबत! दलित पँथर संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.प्रमोद नंदकुमार लोखंडे! यांनी सुरू केलेल्या  “आमरण उपोषणाची” म्हसवड पालिकेने तातडीने दखल घेऊन! मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांनी लेखी आश्वासन दिले की      म्हसवड नगरपरिषद हद्दित वारंवार नळ कनेक्शन संख्येत वाढ होत असलेने व तांत्रिक कारणास्तव अस्तित्वातील पाणी पुरवठा योजनेमधून काही प्रमाणात म्हसवड नगरपरिषद हद्दित पाणी पुरवठा अपूरा होत आहे. त्यासाठी नगरपरिषदेने शेंबडेवस्ती येथील विहिरीवर पाणी शुध्दिकरणासाठी यंत्रणा बसवून म्हसवड नगरपरिषद हद्दिमध्ये पाणी पुरवठा सुरू केलेला आहे. हे नगरपरिषद हद्दीमध्ये ५ ते ६  दिवसाला   पाणी पुरवठा केला जाईल. असे लेखी आश्वासन देऊन विनंती केली की  आपण आपलेनगरपरिषद कार्यालयासमोरील आमरण उपोषण मागे घेवून प्रशासनास सहकार्य करावे. 
त्यानंतर प्रमोद लोखंडे यांनी आपले उपोषण स्थगीत करत असल्याचे जाहिर केले  . त्यावेळी म्हसवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा.सचिन माने,  इंजि.देशमाने साहेब, प्रकाश लोखंडे, व कर्मचारी उपस्थित होते. तसेच आंदोलनात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव सरतापे, युवा कार्यकर्ते सचिन माने, कांग्रेसचे अनिल लोखंडे, तालुका कार्याध्यक्ष आबा सरतापे, संपर्कप्रमुख नवनाथ लोखंडे, उपसंघटक मल्हारी कांबळे, युवा शहर अध्यक्ष राजेश लोखंडे, युवा कार्यकर्ते कुनाल लोखंडे, हणमंत लोखंडे व सर्व पॅंथर कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!