वरकुटे मलवडी येथे जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; ३ लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त, ११ जणांना अटक

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरकुटे मलवडी येथे अवैध जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करत पोलिसांनी तब्बल ३ लाख १२ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ११ जणांना अटक केली आहे.

या कारवाईमुळे परिसरात अवैध धंद्यांवर पुन्हा एकदा आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

सविस्तर हकीकत अशी की, वरकुटे मलवडी (ता. माण) येथील सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे यांच्या घराच्या आडोशाला काही इसम तीन पत्ती पत्त्यावर पैशांची पैंज लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस पथकासह तातडीने छापा टाकत सदर ठिकाणी जुगार खेळणाऱ्या ११ जणांना ताब्यात घेतले.

यामध्ये रोख रक्कम, तीन पत्त्यांचे साहित्य, तसेच मोटारसायकल असा एकूण ३,१२,६७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

कबीर विठ्ठल बनसोडे, अर्जुन सर्जेराव यादव,सचिन अंकुश यादव, गणेश दिगंबर बनसोडे,विजय भानुदास जगताप, विकास हरी यादव,नानासो रामचंद्र मंडले, बाळासाहेब रावसाहेब मिसाळ,संभाजी मल्हारी मंडले, सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे,शिवाजी राम मिसाळ (सर्वजण रा. वरकुटे मलवडी, ता. माण, जि. सातारा)

ही धडक कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अमर नारनवर, देवानंद खाडे, रूपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, सतीश जाधव, श्रीकांत सुद्रिक, तसेच पोलीस मित्र नारनवर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *