भाटकी मार्गे म्हसवड -अकलूज नवीन एसटी बस सेवा सुरू – अंकुश शिर्के व शरद शिर्के यांच्या प्रयत्नांना यश

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी :
भाटकी मधून – नवीन एस टी बस सेवा प्रारंभ 
       आज भाजप युवा नेते श्री.अंकुश शिर्के व सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद शिर्के (गुरुजी) यांच्या प्रयत्नातून मुंबई येथून विशेष परवानगी घेऊन सोलापूर जिल्ह्यातील अकलूज डेपोची अकलूज ते म्हसवड अशी बस सेवा आजपासून सुरू करण्यात आलेली आहे.

      या बस सेवेचे उद्घाटन ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री आण्णा नारायण शिर्के यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरू करण्यात आले. शिवसेना परिवहन विभागाची मुंबई येथून विशेष परवानगी घेऊन सुरू करण्यात आल्यामुळे सदरची सेवा ही अखंडित कायमस्वरूपी सुरू राहील याची खात्री श्री अंकुश शिर्के व शरद शिर्के यांच्यामार्फत देण्यात आली.

      सदरची बस सेवा अकलूज वरून मसवडला सकाळी ठीक 9:00 वाजता जाईल आणि तीच बस म्हसवड वरून भाटकी मार्गे पुन्हा अकलूजला सकाळी 10:30 वाजता पुन्हा परत माघारी जाईल. या बससेवेचे चालक व वाहक यांचा आदरपूर्वक सत्कार भाटकी गावचे माजी बस कंडक्टर श्री. रोहिदास शिर्के व प्रगतशील शेतकरी दादासो शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला.

     आजच आनंदाने भाटकी गावातील अनेक व्यक्तींनी या बसमधून प्रवास करून मनपूर्वक आनंद लुटला. या बस सेवेचा जास्तीत जास्त फायदा आबालवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला व शाळकरी विद्यार्थ्यांना होईल असं मत समाजातील अनेक जाणकारांनी व्यक्त केले. सदरच्या बससेवेचे भाटकी येथे उद्घाटन करताना भाटकी गावातील, कोडलकरवाडी, गाडेकरवस्ती येथील अनेक नागरिक व महिला उपस्थित होत्या. त्यामध्ये युवा नेते श्री.अंकुश शिर्के, सामाजिक कार्यकर्ते श्री.शरद शिर्के, लक्ष्मण अहिवळे, बापूराव शिर्के, हनुमंत जिजाबा शिर्के, पोपट शिर्के, आनंदाभाऊ शिर्के ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत कोळेकर, दादासो पवार, अनिल शिर्के, जगन्नाथ शिर्के, भारत सत्रे, बबन पवार, बाळू रकटे, विलास रकटे, अनिल शिर्के, जयश्री रकटे, पारूबाई रकटे, ललिता शिर्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!