महिलांसाठी व किशोर वयीन मुलींसांठी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर
म्हसवड : प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंतीचे औचित्य साधून माणदेश शिक्षण विकास संस्था म्हसवड, त्रिशक्ती महिला सोशल फौंडेशन महाराष्ट्र व प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी व किशोर वयीन मुलींसांठी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर शुक्रवार दि.०६/०१/२०२३ रोजी स.१० ते दु. २ वा. आयोजित केले आहे या कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुणे म्हणून सौ. छायाताई नानगुडे (अध्यक्षा भूमाता महिला संघटना),अॅड. पंकज दादा धिवार(अध्यक्ष, सिध्दार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य),श्री. बापुसाहेब झुंबर लाड (अखिल भारतीय मराठा सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष )संजयजी रणदिवे (संस्थापक अध्यक्ष , BBMAK India Association ),मा. राजकुमार डोंबे(राज्यकार्यवाह यु क्रा दल),सौ.वनिता बाळासाहेब कोरटकर (राष्ट्रीय उपाध्यक्षा (BBMAK India Association),
सौ. शोभाताई लोखंडे (नगरसेविका ),सौ. रुपालीताई लोखंडे (सचिव, शिवधन अॅग्री डिप्लोमा ) या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत
डॉ. लक्ष्मणराव कोडलकर (माण तालुका वैद्यकिय अधिकारी) मा. डॉ. सचिन माने (मुख्याधिकारी .न. पा.) प्रा. वसंतराव यादव सर (सुप्रसिद्ध व्याख्याते जेऊर) याचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमासाठी सपोनि राजकुमार भुजबळ,पृथ्वीराज राजेमाने , नितीन दोशी , प्रकाश फाळके, नितीन पोटे, सौ. उमा शेटे मॅडम ,सौ.सिमाताई विरकर, भाऊसाहेब नानगुडे , राजेद्र माने ,नितीन तुपे ,विलास हांगे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजक सौ. साधनाताई लोखंडे त्रिशक्ती महिला सोशल फौंडेशन महाराष्ट्र व धर्मराज लोखंडे माणदेश शिक्षण विकास संस्था, म्हसवड यांनी निवेदनाद्वारे सागीतले आहे .
कार्यक्रमाचे स्थळ :- विठ्ठल रुक्मिणी मंदीर, बाजार पटांगण, स्टेट बँके शेजारी, म्हसवड ता. माण