म्हसळा तालुका जैन समाज अध्यक्ष सुरेश जैन यांचे दुःखद निधन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
रायगड
सुशील यादव
म्हसळा प्रतिनिधी :

तालुक्यातील प्रसिद्ध कापड व्यापारी,म्हसळा तालुका जैन समाज अध्यक्ष,केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय संचालक मंडळाचे सदस्य,सामाजिक, राजकीय सेवेची प्रचंड आवड असणारे हसत मुख,हरहुन्नरी,शांत आणि मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व सुरेशशेट भूरमल जैन यांचे दिनांक २३ मार्च रोजी अल्पशा आजाराने पुणे येथील इस्पितळात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

      निधनासमयी त्यांचे वय वर्षे ६१ होते.त्यांचे पश्चात पत्नी,दोन  मुली,मुलगा,भाऊ,चारभहिनी,जावई,सुन, नातवंड आणि आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.होळी उत्सव साजरा होत असताना सुरेशशेठ जैन यांच्या आकस्मात निधनाची बातमी कळताच म्हसळा तालुक्यात शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाने जैन समाजाचा कर्तबगार कार्यकर्ता आणि म्हसळा तालुक्यात व्यापारी आणि सर्वधर्मीय ग्राहक असा दृढ नात जोपासणारा मित्र हरपला आहे.

      त्यांच्या निधनाने जैन आणि सामजिक मित्र परिवाराचे मोठे नुकसान होऊन कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याची मनोभावना राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष समीर बनकर,शिवसेना उद्धव ठाकरे तालुका प्रमुख सुरेश कुडेकर,सार्वजानिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,अशोक काते,बोर्ली येथील जैन समाजाचे श्री ओसवाल,जैन यांनी श्रद्धांजली वाहिली. दिनांक २५ मार्च रोजी दुपारी दोन वाजता म्हसळा हिंदु स्मशान भूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे अंत्ययात्रेला सर्व स्तरांतील मान्यवर मंडळी उपस्थित होती


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!