मेरी माता हायस्कूलच्या माध्यमातून बेसबॉल,सॉफ्टबॉल व रायफल शूटिंग या खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातारा जिल्ह्याचे नाव उंचावत आहेत :नितीन तारळकर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
माण तालुका व मेरी माता हायस्कूलच्या माध्यमातून बेसबॉल,सॉफ्टबॉल व रायफल शूटिंग या खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातारा जिल्ह्याचे नाव उंचावत आहेत यामध्ये मेरी माता हायस्कूल सातारा जिल्ह्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले.
म्हसवड तालुका माण येथे दि. 27 रोजी सातारा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी मा.श्री नितीन माधवराव तारळकर साहेब यांच्या हस्ते सन 2023-24 च्या शालेय क्रीडा स्पर्धेच्या ‘माण तालुका क्रीडा शिक्षक सहविचार सभेच्या’ माध्यमातून सातारा जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धा उपक्रमांची मेरी माता हायस्कूल, म्हसवड या ठिकाणी घेण्यात आलेल्या माण तालुकास्तरीय क्रीडा शिक्षक सहविचार सभेमध्ये *महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस वंदन करून सुरुवात करण्यात आली.
यामध्ये साहेब यांनी माण तालुका हा खरंच सातारा जिल्ह्याची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मान उंचावत असतो आणि त्यामुळे इथून पुढे आपल्या कारकिर्दीत माण तालुक्यातील खेळाडू व क्रीडा क्षेत्राला सदैव वेगवेगळ्या उपक्रम,क्रीडा स्पर्धा व निधी देण्याचे आश्वासन छत्रपती शिवरायांना साक्षी ठेवून दिले. याचवेळी उपस्थित क्रीडा शिक्षक व संघटना जिल्ह्यामध्ये आरक्षित खेळांचा प्रसार व प्रचार त्याचप्रमाणे खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करण्याचा आग्रह पर आदेश दिला आपल्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंचे नुकसान होऊ नये अशी ही विनंती त्यांनी क्रीडा संघटना केली.
यावेळी त्यांनी निर्जरा भोसले, रुद्र काटकर व पायल नांदुगडे या रायफल शूटिंग मधील राज्यस्तरीय खेळाडूंचा सन्मान केला तसेच आंतरराष्ट्रीय बेसबॉल लीग बेसबॉल युनायटेड च्या भारतीय मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाल्याबद्दल विष्णू काळेल यांचाही सन्मान केला. यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील युवा क्रीडाशिक्षक प्रशिक्षक तसेच संघटक यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना योग्य असे मार्गदर्शन व्हावे म्हणून व खरोखरच ग्रामीण भागापर्यंत शासनाच्या सर्व सुविधा पोहोचण्याकरता युवा शारीरिक शिक्षक क्रीडा संघटना स्थापन करण्याचे आवाहन केले. तसेच मेरी माता शिक्षण संकुलाच्या क्रीडा शिक्षक आकाश गुजरे,संतोष खासबागे,विष्णू काळेल यांची कौतुक केले व असेच पुढे कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनी चालू वर्षी म्हसवड व म्हसवड परिसरामध्ये उपलब्ध क्रीडा सुविधेनुसार वेगवेगळ्या खेळाच्या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा (तालुकास्तरीय कुस्ती,बुद्धिबळ व मैदानी क्रीडा स्पर्धा)आयोजनाची संधी देण्याचे उपस्थित सर्व ज्येष्ठ क्रीडा शिक्षक व संघटक यांच्यावतीने आश्वासन दिले.
त्याचवेळी मेरी माता हायस्कूलमध्ये असणाऱ्या रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्रासही सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षकांसमवेत त्यांनी भेट दिली आणि नेमबाजी खेळाचा आनंद घेतला. सहविचार सभेच्या समाप्तीनंतर सुद्धा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी आपण क्रीडा क्षेत्रासाठी सदैव तत्पर असल्याचे ज्वलंत उदाहरण देत ज्येष्ठ क्रीडा संघटक व चित्रपट निर्माते वीरभद्र कावडे सर व प्रशिक्षक आकाश गुजरे यांच्या आग्रहास्तर म्हसवड परिसरातील क्रीडा क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणारे माणदेशी फाउंडेशन तसेच क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी हायस्कूल आणि राष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू घडवणारे श्रीराम कुस्ती संकुल,म्हसवड येथे पाहणी करून खेळाडूंच्या भेटी घेतल्या व भविष्यात लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमा वेळी मेरी माता हायस्कूलचे प्राचार्य फादर सानू,तालुका क्रीडाधिकारी खरात सर,माण तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष जाधव सर,माण तालुका क्रीडाशिक्षक समन्वयक बडवे सर,क्रीडाशिक्षक ज्ञानेश काळे सर, अधिकारी कार्यालयातील विनोद सर, तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक,संघटक व माणदेशी फाउंडेशनचे प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अशोक हांडे सर व आभार प्रदर्शन विष्णू काळेल सर यांनी केले.