गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी उद्याचे भवितव्य : मा.नगराध्यक्ष नितीन भाई दोशी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
दिलीपराज किर्तने
म्हसवड
म्हसवड येथील जे इ इ व ऍडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश मिळवणारा विद्यार्थी स्वातम दोशी, नवोदय परीक्षेत जीशान मुल्ला, स्कॉलरशिप परीक्षेत सुहास नरळे, ओंकार पिसे व सुहानी नरळे, या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा नुकताच अहिंसा पतसंस्थेत शाल व भेटवस्तू देऊन सिद्धनाथ हायस्कूलचे उप प्राचार्य श्री. सहदेव गुरव यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी होते तर प्रमुख पाहुणे क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी स्कूल चे प्राचार्य राहुल फुटाणे होते. यावेळी नितीन दोशी म्हणाले, अहिंसाच्या वतीने आज होणारा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार हा असंख्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी उद्याचे भवितव्य आहे. अहिंसा पतसंस्थेचे काम समाजात धन, गुणीजण व जलसंवर्धन यात वृद्धी होण्यासाठी आहे. श्री राहुल फुटाणे यांनी अहिंसा पतसंस्थेचे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा घेतलेला सत्कार हा त्यांच्या सकारात्मकतेकडे नेणारा असून कधीही निराशा आली तर हा सन्मान त्यांना उभारी देईल,असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी,सिद्धनाथ हायस्कूल व ज्यु.कॉलेजचे,उप प्राचार्य, सहदेव गुरव म्हणाले,…. गेली वीस वर्षे पतसंस्था कार्यरत असून नुसत्या आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधील की मानून विविध क्षेत्रात मदत करीतअसते. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी सोबतच त्यांचे पालक, शिक्षक यांनाही खूप आनंद होत असतो. कारण आपल्या पाल्याची नोंद घेण्यात आली,हे त्यांच्या लेखी मोठी समाधानाची बाजू असते..श्री गुरव यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी स्वातम दोशी ,विद्यार्थ्यांचे पालक यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास विद्यार्थी पालक व्यवस्थापक दीपक मासाळ व नागरिक उपस्थित होते . प्रास्ताविक नीरज होरा यांनी केले आभार अक्षय धट यांनी मानले.