मेगा सैनिक मेळावा मिल्खा सिंह स्टेडियम सब एरिया घोरपडी पूणे येथे गुरुवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. सैनिक फेडरेशन सातारा जिल्ह्यातील सर्व आजी/माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांच्या वतीने प्रशांत कदम (माजी सैनिक) अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन व सदाशिव नागणे अध्यक्ष कराड तालुका, सौ. विद्या बर्गे सातारा जिल्हा अध्यक्ष महीला ब्रिगेड यांनी सैनिकांच्या समस्या संदर्भात निवेदन मेळाव्यात देण्यात आले दरम्यान सैनिक फेडरेशन चे सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन भारतीय सेनेचे मा. लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह. जी. ओ. सी. इन चिफ सदन कमांड पुणे यांचा सन्मान यादरम्यान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, वीर पत्नी,वीर माता, वीर पिता यांच्या समस्या संदर्भात, व सी. एस. डी.कॅन्टीन, तसेच ECHS पॉली क्लिनिक यांचे समस्या संदर्भात निवेदन भारतीय सेनेचे मा. लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह. जी. ओ. सी.इन चिफ सदन कमांड पुणे यांना देण्यात आले.
सदन कमांड चीफ यांनी सर्व सैनिक व त्यांच्या परिवाराला सैनिक मेळाव्यात मार्गदर्शन केले त्यानी आपल्या मार्गदर्शना मध्ये सांगितले की दक्षिण विभागा मध्ये 11 लाख माजी सैनिक व 29 लाख डिपेडन्ट परीवार आहे. जगामध्ये भारतीय सेना ही 7व्या क्रमांकावर आहे. दक्षिण कमान ने 53 महारॅली आयोजीत केल्या व त्या मध्ये 1 लाख वीर पत्नी व माजी सैनिक यांना लाभ झाला. व शेवटी ते म्हणाले राष्ट्र हमारा सन्मान करते आपण सुद्धा दाखवले पहिजे की सैनिकाने आपण स्वतः देशांसाठी किती समर्पित आहे. अशा प्रकारे जोश व अंगावर शहारे आणणारे असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या प्रसंगी पुणे सब एरिया कमांडर मेजर जनरल विक्रांत नाईक, श्रीमती. देविका रघुवंशी आय.डी.ए.एस.(ADDL. C.G.D.A) , ब्रिगेडियर राजेश गायकवाड (नि.) डायरेक्टर डि. एस. डब्लू. महाराष्ट्र, कर्नल आर. आर. जाधव (नि.) उप संचालक डी. एस. डब्लु. महाराष्ट्र, लेफ्टनंट कर्नल हंगे (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पुणे, मेजर आनंद पाथरकर सेना मेडल (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा,विविध विभागातील आर्मी ऑफिसर, सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, वीर पत्नी, सैनिक पत्नी, वीर माता, वीर पिता, शहीद जवान कुटुंबीय बहुसंख्येने उपस्थीत होते.