कराड तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे भेटीगाठीचे सत्र ………………. काही ठिकाणी सदिच्छा भेटी व व कोपरा बैठकीचे नियोजन….

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते

कराड

      जिल्ह्यामध्ये जशी जशी उन्हाची तीव्रता वाढत आहे तस तसे राजकीय वातावरण ही तापू लागले आहे
जिल्ह्यात पायाला भिंगरी बांधून उमेदवार मतदार संघ पिंजून काढू लागले… आहेत……………………..

….. सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेचे राजकीय वातावरण तापले आहे महाआघाडीची शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे महायुतीने अद्याप उमेदवाराची घोषणा केली नाही परंतु खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू सुरू केल्या आहेत. त्यांना प्रतिसाद ही चांगला मिळू लागला आहे

        सातारा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे नुकतीच महायुतीचा मेळावा कराडमध्ये संपन्न झाला आहे त्यामध्ये कराड उत्तर कराड दक्षिण व पाटण तालुका निर्णायक भूमिका घेऊ शकतो व या मतदारसंघात ज्या उमेदवाराला लीड त्या उमेदवाराला विजय निश्चित मानला जातो कारण कराड उत्तर दक्षिण मध्ये मोठ्या प्रमाणात मतदान आहे हे ओळखून या मतदारसंघात दोन्ही मित्र पक्ष व घटक पक्ष यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

        शशिकांत शिंदे यांचे शिलेदार कराड तालुक्याचे नियोजन करत आहेत दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले भाजपचे पदाधिकारी मित्र पक्षाची मोर्चे बांधणी सुरू केली आहे उदयनराजे भोसले यांनी कराड उत्तर मधील अनेक गावांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली, पार्ले, बनवडी, उंब्रज परिसरातील काही गावांना धावती भेट दिली काही ठिकाणी भेटीगाठी कोपरा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते कराड उत्तर मधील शेतकरी संघटना नेते सचिन नलवडे यांच्या पार्ले येथील निवासस्थानी कोपरा बैठकीचे आयोजन व सदिच्छा भेट नियोजन करण्यात आले होते यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

       यावेळी कराड उत्तरचे युवा नेते मनोज घोरपडे रामकृष्ण वेताळ शिवाजी पाटील शंकर पवार सुदाम चव्हाण तुकाराम नलवडे दिपाली खोत शिवाजी पाटील सुनील काटकर यांची उपस्थिती होती ठिकठिकाणी उदयनराजे भोसले यांचे जंगी स्वागत ही करण्यात आले

      जिल्ह्यामध्ये प्रत्येक उमेदवार पायाला भिंगरी लावून मतदारसंघाचा दौरा करत आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये उमेदवारांचा भेटीगाठीचा सिलसिला असाच मतदारांना पाहायला मिळणार आहे त्यातच कराड उत्तरचे मतदान हे निर्णायक ठरणार आहे यात काही शंका नाही


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!