मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया – मुंबई जिल्हा कार्यकारिणी जाहीर
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक अहमद मुल्ला)
मुंबई :
मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई)च्या संस्थापक सदस्यांच्या मंजुरीने आणि संस्थापक अध्यक्ष शीतल हरीष करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष सचिन चिटणीस यांनी मुंबई जिल्हा (शहर) कार्यकारिणी जाहीर केली आहे.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष: चेतन काशीकर (न्यूज नेशन)
उपाध्यक्ष: शाहिद शेख (बीबीसी मराठी)
कार्यवाह: जमिर काझी (तरुण भारत – सोलापूर)
सदस्य:
वैदेही काणेकर (साम टीव्ही)
अनिल जाधव (दैनिक जनखुलासा)
चंद्रकांत गोखले (सा. भूमीसम्राट)
विनीत मासावकर (आकाशवाणी)
विनोद कांबळे (आवाज इंडिया चॅनल)
सुरज खरटमल (रत्न मीडिया)
जिल्हा समन्वयक संघटक: गणेश तळेकर
ही कार्यकारिणी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या एक वर्षाच्या कालावधीसाठी कार्यरत राहणार आहे.
मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई)च्या कार्याध्यक्ष सचिन चिटणीस यांनी ही माहिती दिली.
पत्रकारांच्या हक्क आणि अधिकारांसाठी एकजूट
माई ही पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, प्रसारमाध्यमांच्या सक्षमीकरण आणि नव्या पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत असलेली महत्त्वाची संघटना आहे. नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली पत्रकारिता क्षेत्रात अधिक सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.