कुलदीप मोहिते
म्हसळा – रायगड
म्हसळा नगर पंचायतीमध्ये एक हाती राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे.पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या आदेशाने नव्याने
‘क’वर्ग नगरपंचायतीच्या स्थायी व विषय समित्या व सदस्य यांची संख्या निश्चित करणेसाठी पार पडलेल्या निवडनुकीत म्हसळा नगर पंचायतीमध्ये पाच पैकी चार विषय समिती सभापतीपदावर महीला सदस्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.नगराध्यक्ष संजय कर्णिक यांची विषय समिती अध्यक्षखाली सार्वजानिक व बांधकाम समिती सभापती पदी उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांची निवड झाली आहे.स्वच्छ्ता व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती नगरसेविका सुमैया आमदानी यांची,पाणी पुरवठा व जलनिसारण समिती सभापती माजी उपनगराध्यक्ष सुनिल सेडगे यांची,महीला व बालकल्याण समिती सभापती नगरसेविका नौसीन चोगले यांची,नियोजन व पर्यटन समिती सभापती नगरसेविका राखी करंबे यांची निवड करण्यात आली आहे.स्थायी व विषय समित्या सदस्य संख्या निश्चित करणेसाठी उपविभागीय अधिकारी तथा पिठासिन अधिकारी महेश पाटील यांचे उपस्थितीत बोलावलेल्या विशेष सभेत वरील सभापती व अन्य नगरसेवक,नगर सेविका यांची सदस्य पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.विषय समिती सभापती व सदस्य निवडणूक सुरळीत होण्यासाठी पिठासीन अधिकारी महेश पाटील यांना नगर पंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांनी सहकार्य केले.नवनिर्वाचित सभापती व सदस्य यांची नियत जाहीर होताच त्यांचे सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिंनदन केले आहे.