येथील श्री सत्यनाथ मठातील मठाधिपती योगीराज महंत हिरानाथजी महाराज यांची ३०वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती मठाधिपती रविनाथ गुरु हिरानाथजी महाराजांनी दिली.
योगीराज महंत हिरानाथ महाराज यांची ३०वी पुण्यतिथी आज शुक्रवारी पहाटे ६ वाजता महाराजांच्या समाधीवर फुले टाकण्याचा कार्यक्रमाने संपन्न झाला. सकाळी १० वाजता शहरातून महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते प्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. तत्पूर्वी गुरुवारी संध्याकाळी सत्यनाथ मठात भजनाचा कार्यक्रम साजरा झाला. अशा विविध कार्यक्रमांनी योगीराज महंत हिरानाथ महाराज यांची ३०वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.