माता गुणाई ॲग्रो फार्मर्स फेड प्रोड्युसर कंपनीचा म्हसवड येथे शुभारंभ |

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार महत्वाकांक्षी प्रकल्प अंतर्गत माता गुणाई ॲग्रो फार्मर्स फेड प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीचा भव्य शुभारंभ गुरुवार दि. २७ एप्रिल रोजी दु.1 वा. म्हसवड येथील पुकळेमामा कॉम्प्लेक्स शिंगणापूर चौक येथे संपन्न होणार आहे अशी माहिती माता गुणाई अॅग्रो फार्मर्स फेड प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष बबनदादा विरकर यांनी दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. मंत्री तथा संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. महादेवरावजी जानकर साहेब उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मा. रुपेश जयवंशी यांचे हस्ते होणार आहे. विषेश अतिथी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, आयकर आयुक्त मुंबई डॉ. नितिन वाघमोडे, सन्माननिय उपस्थिती म्हणून माण खटावचे आ. जयकुमार गोरे, माजी विभागीय आयुक्त कोकण विभाग प्रभाकर देशमुख, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव रासप माऊली सलगर, माण देशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, मार्केट कमिटीच्या उपसभापती सौ. वैशाली विरकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!