मासाळवाडी, मसाईवाडी, विरकरवाडी या गावातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा.- नितीन दोशी.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड

म्हसवड प्रतिनिधी
म्हसवड अंतर्गत असणाऱ्या मासाळवाडी, मसाईवाडी, विरकरवाडी या गावला स्वतंत्र महसुली दर्जा दिला आहे यामुळे या गावतील महसूल जमीनीत फेरफार नंबर बदले आहेत. यामुळे या गावांना शासन योजनेतून वगळले आहे.
या गावातील शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने याबाबत त्वरीत दुरूस्ती करून या गावातील शेतकरी यांना न्याय द्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी केली आहे.

पी एम किसन योजने अंतर्गत म्हसवड लगत असणाऱ्या मासाळवाडी, मसाईवाडी,  विरकरवाडी , या गावातील लोकांना CORRECTION IS PENDING AT STATE असा दाखवत असून शेकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही. म्हसवड हद्दीतील , मासाळवाडी, मसाईवाडी, विरकरवाडी , या गावांची पी एम कुसुम सोलर वेबसाईट वरती नावे येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना पी एम कुसुम सोलर योजनेचा लाभ घेता येत नाही. शासनाने याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा याबाबत नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!