मेरी माता हायस्कुल व ज्यूनी. कॉलेज म्हसवड विद्यालयाचा एस एस सी परीक्षेचा सलग २० वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा कायम धनश्री प्रथम, निशिगंधा द्वितीय, संस्कार तृतीय क्रमांक.
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड…प्रतिनिधी…
मेरी माता हायस्कुल व ज्यूनी. कॉलेज म्हसवड विद्यालयाचा इयत्ता 10 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून धनश्री आटपाडकर हिने प्रथम,निशिगंधा कारंडे द्वितीय तर संस्कार जाधव यांने तृतीय क्रमांक पटकाविला आहे..
मेरी माता हायस्कुल व ज्युनि. कॉलेज म्हसवड विद्यालयातील इयत्ता दहावी मधील यशस्वी विद्यार्थी, मिळालेले गुण व गुणानुक्रम पुढील प्रमाणे.कु. धनश्री सतीश आटपाडकर 93.% (प्रथम ), निशिगंधा सत्यवान कारंडे 92.4% (द्वितीय ),संस्कार शिवाजी जाधव 89.6% (त्रितिय ), कोणार्क चंद्रकांत सावंत 89.2%, प्रिन्स लक्ष्मण पवार 89.2 (चतुर्थ ), तनिष्क शिवाजी बर्वे 87.6, कु. संजना शशिकांत पवार 87%, वरद वैभव मंगरुळे 87%, पार्थ किरण काळे 87 %अशा प्रकारे विदयार्थ्यांनी भरघोस गुण मिळवून मेरिमाता हायस्कुल व जुनिअर कॉलेजची 100% निकालाची २० वर्षाची परंपरा कायम ठेवली
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य फादर सनू, फादर रॉबिन,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले .