व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोदवले- पळशी ता.माण येथील मारुती शिवराम माळवे गुरुजी यांचे अल्पशा आजाराने निधन तडफदार ,धाडसी,बाणेदार ,हजर जबाबी,प्रामाणिक,वक्तृत्व ,कर्तृत्व आणि नेतृत्व गुण संपन्न असे स्पष्ट बोलणारे ,अनेकांना मदतीचा हात आणि साथ देणारे ,सुस्वभावी, सदा प्रसन्न ,प्रेमळ, तत्पर, कार्यकुशल, ऐटदार व्यक्तिमत्त्व असे अनेकविधी पैलू असणारे डौलदार पहाडी आणि वाघासारखे व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वदूर परिचित असणारे पळशी ता. माण जि. सातारा या गावचे सुपुत्र सेवानिवृत्त माजी वरिष्ठ प्राथमिक मुख्याध्यापक कै. मारुती शिवराम माळवे म्हणून अनेकांना परिचित असणाऱ्या माळवे सरांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि ते आपल्या सर्वांना सोडून जात अनंतात विलीन झाले
त्यांच्या पश्चात त्यांच्या पावलावर पाऊलावर पाऊल ठेवून प्रामाणिकपणे ज्ञान दानाचे पवित्र आणि प्रामाणिक असे शिक्षण कार्य करणारे त्यांचे चिरंजीव सतेशकुमार माळवे सर आणि त्यांच्या सुनबाई स्नुषा सुचिता माळवे ह्या प्राथमिक शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत तर त्यांचे दुसरे चिरंजीव पंकज माळवे एक प्रगत शेतकरी म्हणून काम करीत आहेत.त्यांचे अचानक जाण्याने कुटुंब, गाव, आणि समाजात शोककळा पसरली आहे. गावात त्यांच्या दुःखद निधनाने हळहळ निर्माण झाली आहे. गावात त्यांच्या निधनांच्या वार्तेने गावतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यांच्या विधी क्रियाकर्म कार्यासाठी जिल्हाभरातून असंख्य लोकांनी उपस्थिती लावली होती.असे एक जबरदस्त आणि छबीदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड लुप्त झाले आहे त्याने समाजात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.सर्वजण त्यांना आप्पा या आदरार्थी नावाने बोलवत असत.