शहीद वीर जवान सुरेश पाचपुते अनंतात विलीन सैनिक फेडरेशन कडून वाहिली श्रद्धांजली

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड सातारा

मंगळवार दि.१/१०/२०२४ कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी (तुळसन)गावचे सुपुत्र शाहिद जवान सुरेश निवृत्ती पाचपुते याना अखेरचा निरोप देण्यात आला . भारत माता की जय,वंदे मातरम, शहीद जवान सुरेश पाचपुते अमर रहे या जयघोशाने परिसर अगदी दणाणून गेला होता.

केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स १७९ बटालियन जम्मू कश्मीर बारामुल्ला येथे सेवा बजावत असताना त्यांना वीर मरण आले.
सातारा जिल्ह्यातील सर्व आजी/ माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय व सर्व क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या अंत्ययात्रे मध्ये बहुसंख्येने सहभागी झाले होते. व यावेळी सैनिक फेडरेशन,शासकीय,सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व पुष्प चक्र वाहण्यात आले.
या प्रसंगी कराड तालुक्याचे तहसीलदार कल्पना ढवळे , महेंद्र जगताप पोलीस निरीक्षक कराड ग्रामीण,. प्रशांत कदम अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन सर्व पदाधिकारी माजी सैनिक,ॲड. आत्माराम पाटील, राजाभाऊ पाटील उंडाळकर माजी जी. प. सदस्य,श्री. उदय दादा पाटील उंडाळकर चेअरमन रयत सहकारी साखर कारखाना, कराड पंचायत समितीचे प्रतिनिधी,सर्व आजी/ माजी सैनिक , सीआर पी एफ चे सर्व सैनिक, सर्कल, तलाठी, गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामस्थ,महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!