हुतात्मा , स्वांतत्र्य सेनानीना, भारतरत्न, महाराष्ट्र भुषणने गौरवा, स्वातंत्र्यसंग्राम अभ्यासिका , शहीद गौरव फलक देशभर उभारा . – सादिक खाटीक*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
आटपाडी  ( प्रतिनिधी )
                भारताच्या स्वातंत्र्यासाठी, मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्रचंड योगदान दिले, हौतात्म्य पत्करले त्या सर्वांना *भारतरत्न,  महाराष्ट्र भुषण* ने गौरवा तसेच त्यांची महती सांगणारी  *स्वातंत्र्य संग्राम अभ्यासिका*  आणि ज्या शुरवीरांनी हौतात्म्य  पत्करले, त्या सर्वांच्या नावा – गावाचा उल्लेख करणारा *शहीद गौरव फलक* प्रत्येक खेडे, गाव, शहराच्या मुख्य ठिकाणी उभारून, स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यास , शहिद – हुतात्म्यांच्या हौतात्म्यास अभिवादन केले पाहीजे. अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी व्यक्त केल्या . 
                १ मे च्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या अनुषंगाने विविध दैनिकांच्या प्रतिनिधींशी सादिक खाटीक बोलत होते .
                देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलीदान दिलेले हुतात्मे, अनंत यातना भोगलेले स्वातंत्र्यसेनानी, सर्व क्षेत्रातले स्वातंत्र्ययोध्ये यांना मरणोत्तर *भारतरत्न* ने गौरवावे . तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शहीद झालेले १०५ हुतात्मे, या लढ्यातील आघाडीची नेते मंडळी, शाहीर, संपादक , पत्रकार, संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यात हाल, अपेष्टा, यातना भोगलेले विविध क्षेत्रातले मान्यवरांना *महाराष्ट्र भुषण* ने गौरवीत *भारतरत्न आणि महाराष्ट्र भुषण* या सन्मानाची आणखी उंची वाढविण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारने करावे . असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी, स्वातंत्र्यसंग्राम अभ्यासिका, शहीद गौरव फलक उभारणीच्या माध्यमातून लाखो करोडो स्वातंत्र्य सैनिकांचा, हजारो हुतात्म्यांच्या देशभक्तीचा प्रचंड वसा – वारसा नव्या पीढीला प्रेरक, उदबोधक, मार्गदर्शक ठरेल . स्वातंत्र्य लढ्याला ज्यांनी विरोध केला आणि इंग्रजांना ज्यांनी समर्थन दिले . असे तथाकथीत देशप्रेमीही यामुळे उघडे पडतील . त्यादृष्टीने केंद्र – राज्य सरकारने देशात – राज्यात सर्वत्र, *स्वातंत्र्य संग्राम अभ्यासिका ,* *शहीद गौरव फलक* उभारणीसाठी तातडीने पावले टाकावीत . असे म्हंटले आहे
                 व्यवसाय, उद्योग, रोजगारासाठी शहरांकडे धावणारे लोंढे गावातच थांबावेत . घुसमटलेल्या, गुदमरलेल्या शहरांनी मोकळा श्वास सोडावा . शहर वाशीयांचे जीवन आरोग्यदायी, सुसह्य व्हावे म्हणून खेडे – गाव आणि त्यांचा गावगाढा सर्वार्थाने समृद्ध होण्यासाठी उद्योग, व्यवसाय, दुध, अंडी, फळफळावळ, शेती मालांवर प्रक्रिया करणारी कारखानदारी गाव गाड्यातच उभारली जावी . सौर आणि पवन उर्जानिर्मितीतून खेड्यातला आर्थिक सुबत्तेचा भारत जगविख्यात बनावा . म्हणून नवे धोरण तातडीने अंमलात आणले पाहीजे . तरच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सार्थकी लागेल .
                समता, बंधुता मानवतेसाठी झगडलेल्या अनेक महामानवांच्या कार्याला डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वोच्य स्थान मिळवून दिले . वर्ण, जात व्यवस्था, गुलामगिरी वाढीस लावणाऱ्या मनुस्मृती ऐवजी भारतीय संविधानाच्या निर्मितीतून कोट्यावधी भारतीयांना सन्मान मिळवून देणारे डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे खरोखरच विश्वनायक आहेत . समस्त भारतीयांच्या विशेषत कामगार, मजुर, महिला, कष्टकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन आणण्यात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रचंड कार्यच कारणीभूत आहे . भारतीय कष्टकऱ्यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे हे कार्य पिढ्यान पिढ्या गौरवित , *” जयभीम ला “* एकमेकांविषयी आदरभाव व्यक्त करणारा नित्याचा भाग बनविले पाहीजे .
                शेतकरी, मजुर , महिला, कामगार , उपेक्षित, वंचित , अल्पसंख्याक, मागास अशा देशातील विविध घटकांसाठी समर्पित होणारे, चौफेर दुरदृष्टीचे, आदरणीय श्री . शरदचंद्रजी पवार साहेबां सारखे प्रगल्भ नेतृत्व भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यास, स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतला, राज्य निर्मितीच्या पासष्टीतला *महाराष्ट्राचा खरा गौरव ठरेल.* असे मत ही शेवटी सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!