कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज निवडणुक प्रक्रिया १८ जागांसाठी ८१ अर्ज दाखल
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
By:कृष्णा लावंड
अकलूज :- प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूजची निवडणूक प्रक्रिया सुरू असून १८ जागांसाठी सत्ताधारी व विरोधकांकडून एकूण ८१ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम. एल. शिंदे यांनी दिली. दि. २ एप्रिल रोजी सत्ताधारी गटाकडून ३७ तर दि. ३ रोजी विरोधकांकडून ४४ अर्ज दाखल झाले आहेत.
सहकारी संस्था मतदार संघासाठी सर्वसाधारण ७ जागांसाठी ३२, महिला राखीवच्या २ जागांसाठी ८, इतर मागासवर्ग एका जागेसाठी ६ तर विमुक्त जाती भटक्या जमाती एका जागेसाठी ५ असे ११ जागांसाठी ५१ अर्ज भरण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघासाठी सर्वसाधारण २ जागांसाठी १०, एससी किंवा एसटी च्या एका जागेसाठी ५. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या एका जागेसाठी ५ असे ४ जागेसाठी सुमारे २० अर्ज भरण्यात आले आहेत.
व्यापारी मतदार संघाच्या २ जागांसाठी ६ तर हमाल / तोलार मतदार संघाच्या एका जागेसाठी ४ अर्ज असे एकूण ८१ अर्ज भरण्यात आले आहेत.
सहकारी संस्था मतदार संघासाठी सर्वसाधारण गटातून मदनसिंह मोहिते-पाटील, मारुतराव रूपनवर, शिवाजी चव्हाण, नितीन सावंत, शहाजीराव देशमुख, बाबूराव कदम, बाळासोा. माने देशमुख, रामचंद्र गायकवाड, मालोजीराजे देशमुख, श्रीनिवास कदम पाटील, पद्मजादेवी मोहिते-पाटील, नागेश काकडे, रणजितसिंह देशमुख, उत्तम जानकर, बाळासाहेब सावंत, मधुकर वाघमोडे, राहूल सावंत, गणेश इंगळे, पांडूरंग पिसे, पांडूरंग वाघमोडे, अजित बोरकर, राजेंद्र वाळेकर, दादासाहेब लाटे, शरद पाटील, लक्ष्मण पवार. याच मतदार संघातून महिला राखीवसाठी मेघा साळुंखे, अमृता सुरवसे, रोहिणी खराडे, पदमजादेवी मोहिते- पाटील, शोभा कागदे, सोनाली पाटील. याच मतदार संघातून इतर मागासवर्गीय गटासाठी भानूदास राऊत, दत्तात्रय पिसे, भिमराव फुले, उत्तम बरडकर, पोपट बोराटे, याच मतदार संघातून विमुक्त जाती/ भटक्या जमाती गटातून संदिप पाटील, विश्वजीत पाटील, अंबादास ओरसे, अजित बोरकर यांनी अर्ज भरले आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटातून बापूराव पांढरे, लक्ष्मण पवार, विष्णू घाडगे, श्रीनिवास कदम पाटील, पदमजादेवी मोहिते-पाटील, केशवराव पाटील, तानाजी जगदाळे, शहाजीराव देशमुख. याच मतदार संघातून अनुसूचित जाती/ जमातीसाठी दत्तूराम लोखंडे, रामचंद्र डावरे, उत्तम जानकर, मिलिंद सरतापे. याच मतदार संघातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जागेसाठी पोपट भोसले, यशवंतराव घाडगे, रामचंद्र गोडसे, राहूल सावंत यांनी अर्ज भरले आहेत.
व्यापारी मतदार संघातून आनंद फडे, महावीर गांधी, मोहसीन बागवान, दिपक गरड तर हमाल व तोलार मतदार संघातून उध्दव डोंगरे, रविंद्र भोसले व संजय कोळेकर यांनी अर्ज भरले आहेत.
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांनी मोठी आघाडी उघडली असली तरी दि. ५ एप्रिल रोजीच्या छाननीमध्ये किती अर्ज वैध ठरतात व दि. ६ ते २० एप्रिल पर्यंत कोण माघार घेतोय यावरून निवडणूकीचा रागरंग समजून येईल.