बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेतर्फे साजरा होणार ‘मराठी बाल नाट्य दिवस’.
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
गणेश तळेकर
मुंबई:प्रतिनिधी
अखिल भारतीय नाट्य परिषदेची बालरंगभूमी परिषद ही संलग्न संस्था आहे. महाराष्ट्रातील सर्वच शाखांमध्ये 2 ऑगस्ट हा दिवस बालकलाकारांचा हक्काचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
२ ऑगस्ट १९५९ या दिवशी माननीय सुधा करमरकर यांनी ‘मधुमंजिरी’ हे पहिल बालनाट्य रंगमंचावर प्रस्तुत केल. तेथूनच पहिल्यांदा बालनाट्य सादरीकरणाला सुरुवात झाली. बृहन्मुंबई शाखेतर्फे सुद्धा हा दिवस साजरा होणार आहे.
हा कार्यक्रम’ विद्याधिराज स्कूल आणि जूनियर कॉलेज’टाटानगर, भांडुप (पूर्व) येथे सकाळी ८ते १०.३० ह्या वेळेत सादर होणार आहे. या कार्यक्रमात विद्याधिराज शाळेचेच विद्यार्थी कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात पथनाट्य, पोवाडा, समरगीत, महाराष्ट्रातील वीरांगना ,ढोलकी- वादन, नृत्य, आणखीही बऱ्याच कार्यक्रमांचा समावेश आहे. एकूणच काय तर नृत्य -नाट्य -गायन- वादन हे सर्वच प्रकार ते विद्यार्थी सादर करणार आहेत.मुलांची परीक्षा असून सुद्धा केवळ बाल कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत, आणि खारीचा वाटा उचलणार आहोत, असे प्रतिपादन विद्याधिराज स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक- प्रिन्सिपल’ शशीधरन सर’ यांनी बृहन्मुंबई शाखेच्या कार्याध्यक्षा ज्योती निसळ यांच्याशी बोलताना केले.