युद्धनौका गुलदार पर्यटन मंडळाकडे सोपवण्याचा सन्मान माण च्या  सुपुत्राला.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड (दिलीपराज कीर्तने )
हिंदुस्तानच्या नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सोपवण्याचा सन्मान  माण तालुक्याचे सुपुत्र कारवार नौदलाचे कॅप्टन जयवंत आनंदराव  इंदलकर यांना मिळाला असून हा सन्मान तमाम माणदेशी जनतेचा समजला जात आहे.
गुलदार  ही निवृत्त युद्धनौका नौदलाकडून महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सोपवणारे नौदलाचे कॅप्टन जयवंत आनंदराव इंदलकर हे उकिरडे महिमानगडचे सुपुत्र आहेत. केंद्रीय संघ लोकसेवा आयोगामार्फत नेव्हल एक्झिक्यूटिव्ह पदी निवड झालेले जयवंत इंदलकर सध्या नौदलामध्ये कॅप्टन समकक्ष कर्नल या सन्मानाच्या पदावर कारवार येथे कार्यरत आहेत. देशभरातील नौदलाच्या विविध कॅम्पमध्ये जयवंत इंदलकर यांनी आजवर  उल्लेखनीय सेवा केलेली आहे.
          महाराष्ट्र पर्यटन महामंडळ गुलदार  युद्धनौकेचा वापर समुद्राच्या आत मालवणच्या वेंगुर्ला जवळील निवती  समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रिप पर्यटनासाठी करणार आहे. या युद्धनौकेचे प्रमाणित स्कुबा ड्रायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना दर्शन घेता येणार असून पर्यटकांसाठी हे खास आकर्षण असणार आहे.
           कॅप्टन जयवंत इंदलकर  यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, सनदी अधिकारी  सुरेश जाधव, माजी  अप्पर राज्यकर आयुक्त विलासराव इंदलकर, मंत्रालय उपसचिव प्रकाश इंदलकर, माजी  जॉइंट कमिशनर उत्तमराव इंदलकर, जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर, क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवडचे अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर  , बाळासाहेब पिसाळ    इत्यादी मान्यवरांनी नौदल दो ‌‌ कॅप्टन जयवंत इंदलकर यांचे अभिनंदन केले .
========================.   


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!