माणकीत ‘स्वस्थ नारी – स्वस्थ परिवार अभियान’ अंतर्गत भव्य आरोग्य शिबीर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

इम्रान मुल्ला

माणकी, ता.माळशिरस:प्रतिनिधी
प्राथमिक आरोग्य केंद्र, माणकी  ता. माळशिरस   यांच्या वतीने “स्वस्थ नारी, स्वस्थ परिवार” अभियानाअंतर्गत महिलांसह बालकांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार पडले.

शिबीराचे उद्घाटन सरपंच श्रीमती दिक्षित यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीत डॉ. श्वेता कोळेकर होत्या.

या शिबीरात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सागर कोळेकर व डॉ. श्वेता कोळेकर यांनी गरोदर महिलांची तपासणी केली. बालरोग तज्ञ डॉ. संतोष माने-देशमुख यांनी सर्व बालकांची तपासणी करून मार्गदर्शन केले. तसेच डॉ. फरहिन सय्यद व डॉ. पूजा केमकर यांनी महिलांची तपासणी केली. पुरुषांच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी डॉ. प्रशांत पाटील, डॉ. महादेव खटाळ व डॉ. विकास मगर यांनी निभावली.

असंसर्गजन्य आजार तपासणीसाठी श्रीमती सुचिता गोचडे व श्रीमती प्रणाली साळवे यांनी स्क्रिनिंग केले. महिलांच्या आरोग्य, आहार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉ. श्वेता कोळेकर व आरोग्य सेविका श्रीमती ज्योती माळी यांनी मार्गदर्शन केले.

रक्त तपासण्या श्रीमती प्रिया जाडकर व श्री संजय इंगळे यांनी केल्या. प्रास्ताविक आरोग्य निरीक्षक श्री सुनील कावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सुनील पुलिगेट यांनी मानले.

शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री प्रमोदकुमार जगताप, श्री अक्षय जाधव, श्री विजय कांबळे, श्रीमती पुनम माळी, श्रीमती वर्षाराणी दणाने, श्रीमती अर्चना सोरटे, श्रीमती मदिना मुलाणी, श्रीमती सयाबाई वंजारे यांच्यासह सर्व आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांनी अथक परिश्रम घेतले. औषधनिर्माण अधिकारी श्री ज्ञानेश्वर पेटकर, श्रीमती रेश्मा कांबळे, श्री सोमेश कुलकर्णी व श्री काजी (DEO) यांचेही विशेष सहकार्य लाभले.

या शिबीरामुळे माणकी परिसरातील शेकडो नागरिकांना मोफत तपासणी व औषधोपचाराचा लाभ मिळाला. 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *