अरविंद बापू पिसे यांचा जाहीरनामा: विकासाची शपथ आणि जनतेची सेवा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड :
गेल्या सात-आठ वर्षांपासून लोकहितासाठी सतत सक्रिय अरविंद बापू पिसे हे प्रहार जनशक्ती पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून, त्यांनी मागील सात-आठ वर्षांपासून आपल्या समाजातील विविध घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी, विधवा, निराधार महिला, जेष्ठ नागरिक आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींसाठी त्यांनी सातत्याने मदत केली आहे. त्यांची ही सेवा समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय ठरली आहे.

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी संशोधनात्मक दृष्टिकोन
पिसे यांनी आपल्या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अभ्यासपूर्ण उपाययोजना राबवल्या आहेत. त्यांनी विविध योजनेतून पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी भूमिका मांडली आहे. याशिवाय, घरकुल योजना राबवून 318 लाभार्थ्यांना 8 कोटी रुपयांचे अनुदान मिळवून देत अनेकांचे घराचे स्वप्न साकार केले आहे. बांधकाम कामगारांसाठी त्यांच्या हक्काचे दोन लाख रुपयांचे अनुदान मिळवून देण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

शिक्षण, रोजगार, आणि आरोग्य यांसाठी ठोस प्रयत्न
सुशिक्षित बेरोजगारी, शैक्षणिक अडचणी, आणि वैद्यकीय मदतीसाठी पिसे यांनी नेहमीच आपली भूमिका प्रभावीपणे मांडली आहे. अनेक तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन तर शैक्षणिक अडचणींवर उपाय शोधण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

प्रभावी प्रचार आणि प्रचंड जनाधार
आपल्या प्रचार मोहिमेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचण्याचा पिसे यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, विजयाबाबत ते आत्मविश्वासाने बोलत आहेत. “बॅट” हे निवडणूक चिन्ह घेऊन ते मैदानात उतरले असून, मतदारांनी 4 नंबरवर असलेल्या “बॅट” चिन्हसमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका
पिसे यांनी कोणत्याही प्रकारच्या माघारी किंवा पाठींब्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची तयारी दर्शवली असून, जनतेच्या हितासाठी लढण्याची ग्वाही दिली आहे.

जनतेच्या विश्वासासाठी विनंती
“आपल्या विश्वासामुळेच मला अधिक जोमाने काम करता येईल. मला प्रचंड बहुमतांनी विजयी करून जनतेची सेवा करण्याची आणखी एक संधी द्या,” अशी विनंती अरविंद बापू पिसे यांनी केली आहे.

आपले विश्वासू:
अरविंद बापू पिसे,
प्रहार जनशक्ती पक्ष


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!