उंब्रज मध्ये साकारत असलेल्या अश्वारूढ पुतळ्यास मंगेश चिवटे यांची सदिच्छा भेट.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
उंब्रज: प्रतिनिधी श्रीकांत जाधव

उंब्रज मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य असे शिल्प साकारत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा ही समस्त उंब्रज व आजूबाजूच्या परिसरातील लोकांची इच्छा आहे या इच्छेला मूर्त स्वरूप देण्याचे काम श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रज यांनी केले आहे .

       माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंभुराजे देसाई यांनी शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या उंब्रज पाठपुराव्याच्या माध्यमातून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच आत्ता युती सरकारच्या माध्यमातूनही निधीची कमतरता भासू देणार नाही. उंब्रज मध्ये होणाऱ्या छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मंगेश चिवटे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू सहकारी व ज्यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू झाले व शिवसेना एकनाथजी शिंदे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख यांनी उंब्रज बाजारपेठेतील पुतळ्याच्या सदिच्छा भेटी दरम्यान काढले .
तसेच उंब्रज मधील नागरिकांचा संकल्प पूर्ण होत आहे.याचा आम्हाला आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम अतिशय दर्जेदार उत्तम व समाधानकारक आहे याचा आम्हाला आनंद होत आहे असे गौरव उद्गार त्यांनी यावेळी काढले.
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्फत आपण सदैव रुग्णांची सेवा करण्यासाठी तत्पर आहोत. व श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रज जे उंब्रज परिसरात सामाजिक कार्य करत आहे रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देत आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे असे आवर्जून त्यांनी यावेळी सांगितले.

मंगेश चिवटे आज कराड येथे स्पंदन ट्रस्ट तर्फे आयोजित स्पंदन पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी आले होते त्यांनी जाताना उंब्रज बाजारपेठेमध्ये होत असलेल्या छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या बांधकाम ठिकाणी सदिच्छा भेट दिली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आणि तसेच श्री शिव योद्धा प्रतिष्ठान यांच्यावतीने मंगेश चिवटे यांचे शाल व श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले यावेळी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *