माणगंगा पॅरामेडिकल कॉलेज  अंतर्गत DMLT विद्यार्थ्याचा शुभचिंतन व निरोप समारोह

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी
माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी येथे माणगंगा पॅरामेडिकल कॉलेज अंतर्गत DMLT विद्यार्थ्याचा शुभचिंतन व निरोप समारोह  अतिशय उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी सौ रोहिणी चव्हाण, व श्री कुशल सातपुते तसेच मार्गदर्शक डॉ अनिता घुटुकडे, श्री मारुती मासाळ सर, आप्पासाहेब घुटूकडे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ वसंत मासाळ यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
मासाळवाडी सारख्या ग्रामीण भागात ग्रामीण भागातील मुलांना व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून हे कॉलेज उभारले त्याचे आज अतिशय चांगले नाव झाले. येथे येणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे ,तीन ते चार जिल्ह्यातून गरीब  आर्थिक दुर्बल घटकातील मुले मुली प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःचा व्यवसाय उभा करतात ,काही मुलांना खाजगी सरकारी नोकरी मिळाली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहतात.10वी किंवा 12वी पास झाल्यावर स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा आरोग्य विभागातील एकमेव व्यवसाय आहे. DMLT व, redioloji radiology technician,skill development मधील नर्सिंग असे अभ्यासक्रम माणगंगा paramedical College मध्ये अतिशय गुणवत्ता पूर्ण शिकवले जातात. त्याचाच परिणाम म्हणून हे विद्यार्थी आपला व्यवसाय करत असतात.
कॉलेज chya माजी विद्यार्थी रोहिणी चव्हाण व कुशल सातपुते यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. भविष्यात हि अश्या होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील मुलांना त्याचा फायदा घ्यायचा आहे
यावेळी माजी विद्यार्थी रोहिणी चव्हाण ने मनोगत व्यक्त करत कॉलेज विषय कृतज्ञ पूर्वक आपल्या आयुष्यामध्ये चांगला बदल झालेला सांगितले. आज् मी माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत करते ती केवळ या कॉलेजमध्ये शिकलेल्या DMLT या कोर्समुळे.
श्री कुशल सातपुते यांनीही आपल्या मनोगतातून सांगितले की मी व शशिकांत कबीर दोघांनी स्वतःची लॅब म्हसवड मध्ये सूरू करुन चांगला व्यवसाय करीत आहे. आम्हा दोघांनाही आतापर्यंत कोणतीही अडचण आली नाही. सर्व मुलांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी गरीब परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी अतिशय चांगला व्यवसाय प्रशिक्षणाचा कोर्स आहे. आपण याचा फायदा घ्यावाअसे सांगितले. कॉलेज प्राध्यापक श्री बगाडे संतोष यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच प्रशिक्षित विद्यार्थ्यांनीनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कॉलेजच्या प्राचार्या सौ सविता वसंत मासाळ, उपप्राचार्य सौ श्रद्धा करमाळकर, कु रसिका गुंजाणे मॅडम, प्रा. श्री संतोष बगाडे सरं, श्री आकाशदीप कापरे सर व सर्व विध्यार्थी उपस्थित होते.  उपप्राचार्या  सौ करमाळकर मॅडम यांनी  आभार मानले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!