माणगंगा पेरामेडीकल कॉलेज मासाळवाडी हे ग्रामीण भागातील मुलांना आधार… ॲड दत्तात्रय हांगे.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
मासाळवाडी
माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी येथे सन 2023-24 ची नवीन DMLT व radiology technician विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ आयोजित प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ वसंत मासाळ, प्राचार्या सविता मासाळ,उप प्राचार्या श्रद्धा करमाळकर  , प्रा बगाडे सर, प्रा गुंजाने मॅडम, माणगंगा इंग्लीश मिडीयम स्कूल विभागाचे मुख्याध्यापक श्री रावसाहेब मासाळ सर व इतर शिक्षक सह माजी विद्यार्थी, नवीन प्रवेशित विध्यार्थी उपस्थित होते.
ॲड दत्तात्रय हांगे पुढे म्हणाले की माण तालुक्यासह इतर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणीं DMLT व radiology technician सारख्या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण साठी प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन..
अभ्यास पूर्ण केल्यावर त्यांनी आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करून, कामातील समय सूचकता ओळखुन गांभीर्याने  काम केले पाहिजे. दोन वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यावर आपल्याला हमखास व्यवसाय अथवा नोकरीची सुवर्णसंधी चालून येणार आहे. वैद्यकिय क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल घडत आहेत, आपणही विविध तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे.माणगंगा शैक्षणिक संस्था अतिशय चांगल्या प्रकारे विध्यार्थी तयार करीत आहे त्या बद्दल सर्व संचालक व शिक्षकांचे अभिनंदन…
संस्थेचे अध्यक्ष डॉ वसंत मासाळ बोलत असताना  paramedical College स्थापन करण्यासंदर्भात ग्रामीण भागातील मुलीं मुलांचे विचार केला. त्यांचें शिक्षण अर्धवट अवस्थेत राहू नये शिवाय हा कोर्स पूर्ण केल्यावर त्या मुलीला मुलांना स्वतचं अस्तित्व तयार करता यावे यासाठी व्यवसाय शिक्षण चे DMLT व radiology technology सारखे सूरू करण्यात आले.2013पासून आतापर्यंत जे विद्यार्थ्यांनी या कॉलेज मध्ये प्रशिक्षण घेतले ते सर्व मुलांना नोकरी करीत आहेततर काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. हे कॉलेज ग्रामीण भागातील तळागळातील मुलांमुलींसाठी एक वरदान ठरत आहे.
कार्यक्रमावेळी सर्वांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व  लोकशाहीर आणाभाऊ साठे यांची जयंती माणगंगा इंग्लीश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करीत पुष्पहार अर्पण करून साजरी केली.
कार्यक्रमाचे आभार सजगणे सर यांनी केले…

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!