जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूलचा दबदबा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड :प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रम शाळा, खराडेवाडी (ता. फलटण) येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेत माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी करत शाळेचा दबदबा निर्माण केला.

या स्पर्धेत 17 वर्षे मुलींच्या गटात माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला, तर 14 वर्षे मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक मिळवून कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
या यशाबद्दल माणगंगा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक डॉ. वसंत मासाळ, सचिव नारायण मासाळ, उपाध्यक्ष सुखदेव मासाळ, डॉ. सविता मासाळ, तसेच माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य रावसाहेब मासाळ यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पालक वर्ग व शिक्षकांनीही विद्यार्थिनींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

