मासाळवाडी(म्हसवड)ता. माण येथे अतिशय अडचणीच्या परिस्थिती मध्ये गोरगरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी माणगंगा शैक्षणिक संकुल काम करीत असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर सुनील पोरे यांनी केले. माणगंगा शैक्षणिक संकुल व प्यारामेडिकल कॉलेज येथे विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ.वसंत मासाळ होते. प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार विठ्ठल काटकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना सुनील पोरे म्हणाले की मासाळवाडीच्या माळरानावर डॉ. मासाळ यांनी माणगंगा शैक्षणिक संकुल स्थापन करून मासाळ वाडी व परिसरातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे. म्हसवड सारख्या शहरा पासून जवळच्या अंतरावर हे संकुल चांगलं काम करीत आहे. या संकुलातून अनेक विद्यार्थी घडले असून चांगल्या ठिकाणी काम करीत आहे याचे सर्व श्रेय या संकुलला आहे, असे त्यांनी सांगितले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पत्रकार विठ्ठल काटकर यांनी सांगितले की या शैक्षणिक संकुलातून तुम्हाला ज्ञान मिळाले आहे त्याचा उपयोग जीवनात चांगल्यासाठी करा, आई वडील, शाळा, कुटूंबातील सर्वांचं नावं उज्ज्वल करा, व्यसनापासून लांब रहा, चुकीचं काम करू नका, चांगली संगत ठेवा, आणि आयुषयाची वाटचाल करा. म्हसवड येथील तरडे सर यांनी इयत्ता दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला दरवर्षी पाच हजार रुपयाचे पारितोषिक जाहीर केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.वसंत मासाळ यांनी या संकुलाच्या आतापर्यंत झालेल्या प्रवासाचा आढावा घेतला. कार्यक्रमास म्हसवड येथील कांता मामा रसाळ,सामाजिक कार्यकर्ते आनंदराव शेंडगे,मुख्याध्यापक मासाळ सर, विद्यार्थी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सजगणे सर यांनी केले. चौकट :-म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर सुनील पोरे साहेब यांनी माणगंगा शैक्षणिक संकुल साठी पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विंधन विहिरीसाठी देणगी जाहीर केली. त्याबद्दल डॉ. वसंत मासाळ यांनी त्यांचे आभार मानले.