माणगंगा शैक्षणिक संकुल हे व्यावसायिक पिढी घडविण्याचे केंद्र.: नितीन वाघमोडे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
मासाळवाडी म्हसवड येथील माणगंगा शैक्षणिक संकुल मध्ये स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयकर आयुक्त मा. नितीन वाघमोडे बोलत होते

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष नितिन दोशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण संघटना अध्यक्ष मा. सुहास पाटील, नासपचे अध्यक्ष इंजि. सुनिल पोरे साहेब, राज सोणवले,आदी मान्यवर उपस्थित होतें.यावेळी बोलताना नितिन वाघमोडे पुढे म्हणाले की माणगंगा शैक्षणिक संकुल हे माण तालुक्यांतील नावाजलेले संकुल आहे, या ठिकाणी व्यवसाय प्रशिक्षण देवून व्यावसायिक पिढी घडवण्याचे काम संस्था करीत आहे. या संकुलात प्रशिक्षण घेतलेला डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन, रेडियोलॉजी टेक्निशियन, नर्सिंग पुर्ण विध्यार्थीना मोठया शहरात मोठी मागणी आहे, ते त्या ठिकाणी नोकरी करीत आहेत, शिवाय स्वतःचा व्यवसाय करित आहेत .स्किल डेव्हलपमेंट योजनेंतर्गत अतिशय चांगलें शिक्षण ग्रामीण भागातील मुलांसाठी चालु आहे याचा अभिमान आहे. या संकुलातील शिक्षण उच्च श्रेणीत मोजले जाईल अशी तयारी या मुलांची आहे. . डॉ वसंत मासाळ व त्यांची पत्नी सौ सविता तसेच सर्व संचालक मंडळ सर्व शिक्षक कर्मचारी यांचे अथक प्रयत्नांनी हे संकुल नक्कीच उंच शिखरावर पोहचेल. अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.



