माणदेशी रेडीओ तर्फे योगदिवस उत्साहात साजरा
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड
माणदेशी फौंडेशन संचालित माणदेशी तरंग वाहिनी ,म्हसवड आणि आयुष मंत्रालय व CEMCA यांच्या वतीने २१ जून या आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त मंगळवार दि.२० जून रोजी सकाळी ८ वाजता श्री.सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनि. कॉलेज,म्हसवड मध्ये योगादिन साजरा करण्यात आला. तसेच १५ मे ते २१ जून या कालावधीत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने माणदेशी रेडिओवरून सायंकाळी ६.१५ मिनिटांनी ‘चला योग करूया’ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रोज किमान ४५ मिनिटे तरी आपण योगासाठी दिले पाहिजेत. आरोग्य हिच खरी संपत्ती, आहार मार्गदर्शन, योग हि पूर्ण जगाला भारताने दिलेली संजीवनी आहे आणि म्हणूनच २०१५ पासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो.अशी प्रस्तावना माणदेशी रेडिओच्या निवेदिका रसिका विरकर यांनी केली. तसेच योग दिनविशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक आर्ट ऑफ लिविंगच्या योग शिक्षिका जयश्री नरळे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी ताडासन,वृक्षासन,त्रिकोणासन,अर्धचंद्रासन तसेच श्वसनाचे वेगवेगळे योग करून त्याचे फायदे सांगितले आणि यासाठी विद्यार्थ्यांचाही खूप छान प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमासाठी माणदेशी रेडिओचे कार्यक्रम संचालक अनुप गुरव,निवेदिका कांचन ढवण,चैताली कोले तसेच श्री सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. दासरे सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.