म्हसवड प्रतिनिधी : माण देशी फाऊंडेशनतर्फे ५ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत परळ येथील नरे पार्क मैदानात ‘माणदेशी महोत्सव २०२५’चे आयोजन केले आहे.
दुष्काळी तालुका म्हणून माण तालुक्याची ओळख या भागातील माणदेशातील पारंपरिक आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ, हस्तकला प्रदर्शन व विक्री, कला कार्यशाळा आदींचा समावेश महोत्सवात आहे. माणदेशी फाऊंडेशनच्या उपक्रमांच्या माध्यमातून सक्षम झालेल्या १० लाख महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपात महोत्सवात गौरव करण्यात येणार आहे. माणदेशी महोत्सवाचे सहावे वर्ष असून उद्घाटन बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख उपस्थिती माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांची आहे.
महोत्सवाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
रुचकर भोजन दालन महोत्सवाचे एक आकर्षक वैशिष्ट्य म्हणून, रुचकर भोजन दालन असतील, जिथे पाहुणे ग्रामीण महाराष्ट्राच्या पारंपारिक आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकतात. गावरान मटण आणि भाकरी, थालिपीठ, कोल्हापुरी मिसळ, मासवडी, यांसारख्या पदार्थांची चव घेतली जाऊ शकते.
हस्तकला प्रदर्शन व विक्री : महोत्सवात अप्रतिम ग्रामीण कलेचे प्रदर्शन पाहता येईल. जेन आणि घोंघडी (पारंपारिक दागिने बनवणे). कोल्हापुरी चपला तयार करणे. सर्व वयोगटाच्या व्यक्तींना, विशेषतः मुलांना मातीचे मडके बनविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.
कला कार्यशाळाः महोत्सवात हस्तकला कार्यशाळा भरवण्यात येईल. जिथे पाहुणे माण देशी महिलांकडून पारंपारिक कलेची प्रशिक्षण घेऊ शकतात. या कार्यशाळांमध्ये वारली पेंटिंग आणि लाइव्ह दागिने बनवण्याच्या सत्रांचा समावेश असेल.
सांस्कृतिक कार्यक्रमः ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी महोत्सवात गजी नृत्य आणि कुस्तीचे मुकाबले यांचा समावेश असेल. अवधूत गुप्ते महोत्सवात रंग भरतील.
कार्यक्रमाची रुपरेषा
बुधवार दि. ५ फेब्रुवारी २०२५ सायं. ४:०० वा. उद्घाटन सोहळा माण देशातील लोकप्रिय पारंपारिक गज्जी लोकनृत्य आणि मंगळागौर
गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०२५ सायं. ६:०० नंतर माणदेशी चॅम्पीयन्स मुलींचे कुस्ती सामने
शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी २०२५ सायं. ४:३० नंतर माणदेशी शेतकरी बैठक सायं. ७:०० वा. अवधूत गुप्ते संगीत रजनी
शनिवार दि. ८ फेब्रुवारी २०२५ सायं. ६:०० नंतर अभंग रिपोस्ट सादरीकरण
रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ सायं. ६:०० नंतर सांगता सोहळा