माणचे आमदार हे जलनायक नसून खलनायक :रणजितसिंह देशमुख
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
माढा लोकसभा मतदार संघातील माण, खटाव व फलटण विधानसभा मतदार संघ निहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आज दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष मोहन जोशी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा उदय सिंह पाटील दादा सातारा जिल्हा अध्यक्ष सुरेश राव जाधव सोलापूर जिल्हा अध्यक्ष धवलसिह दादा मोहिते पाटील सातारा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अमरजित कांबळे किसान काँग्रेस पुणे विभाग उपाध्यक्ष विश्र्वंभर बाबर, सातारा जिल्हा अल्प संख्या क सेलचे अध्यक्ष झाकीर भाई पठाण माण विधानसभा अध्यक्ष महेश गुरव माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब याने खटाव तालुका अध्यक्ष संतोष गोडसे मा एम के भोसले बाळासाहेब माने माण तालुका महिला अध्यक्ष नकुसाताई जाधव भिमराव काळेल शिवाजी राव यादव बाबा साहेब बनसोडे गब्बारभाई काझी व सर्व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी बोलताना हरणाई सह. सूतगिरणी माणदेशी सह सूतगिरणी चे चेअरमन रणजित सिंह देशमुख म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुळे माण खटाव ला जीहे कठापुर व उरमोडी चे पाणी आले आहे.
ज्या पृथ्वीराज बाबांनी माण ला पाणी दिले त्यांचे नाव ही ते सभेत घेत नाहीत.जनतेसाठी आम्ही उभारत असलेल्या साखर कारखान्याला विरोध करतात . ते काँगेस चे गद्दार आहेत. अशी घणाघाती टिका आ जयकुमार गोरे यांच्यावर नाव न घेता केली. रणजित देशमुख पुढे म्हणाले, आम्ही दोन सूतगिरण्या उभ्या केल्या, कारखान्याचे काम ही सुरू आहे. हजारो तरुणांना काम दिले. माण च्या लोकप्रतिनिधींनी साधी पिठाची गिरणी तरी उभी केली आहे का? असा जाब जनतेने विचारण्याची वेळ आली आहे. नुसते नारळ फोडण्याचा धंदा बंद करा. खरे काय आहे ते जनतेसमोर मांडावे.माण व खटाव तालुक्यातील जनता त्रासली आहे. मुळ काँग्रेस चे असलेले कार्यकर्ते भाजप मध्ये गेले आहेत. त्यांनी पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश करावा त्यांचे स्वागत केले जाईल. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून काँग्रेस चा झेंडा फडकविन्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अशी ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली.
**
माण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस ला सोडावा—
या बैठकीत कार्यकर्त्यांनी भरभरून भावना व्यक्त केल्या.जास्तीतजास्त कार्यकर्त्यांनी माण व खटाव तालुक्यात पाणी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी औद्योगिक प्रकल्प उभारले जावेत यासाठी प्रयत्न व्हावेत.तसेच दुष्काळी परिस्थिती वाढत चालली असून गुरांसाठी चारा छावण्या उभारल्या जाव्यात अशी मागणी ही अनेक कार्यकर्त्यांनी केली. काँग्रेस ने स्वबळावर लढावे . माण विधानसभा मतदार संघ काँगेस ला सोडावा अशी मागणी ही काही कार्यकर्त्यांनी केली.