माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मंगरूळे जिल्हा प्रतिनीधीपदी विशाल गुंजवटे.

बातमी Share करा:

दहिवडी – माण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै.लोकमतचे प्रतिनीधी सचिन मंगरूळे यांची तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून दै.सकाळचे प्रतिनीधी विशाल गुंजवटे ,उपाध्यक्षपदी दै.सत्यसह्याद्रीचे प्रतिनिधी नवनाथ भिसे , सचिवपदी माण चौफेरचे संपादक बापूसाहेब मिसाळ ,खजिनदारपदी दै.पुण्यनगरीचे प्रतिनीधी अभिजित अवघडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
  माण तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जेष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे ,जेष्ठ पत्रकार दीपक तंडे-बडवे ,मार्गदर्शक लालासो दडस यांच्या प्रमुख उपस्थितीत दहिवडी ता.माण येथील विश्रामगृहात पत्रकार संघाच्या निवडीची बैठक संपन्न झाली.त्यावेळी सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या.यावेळी वर्षभरातील विविध कार्यक्रमांचे नियोजना संदर्भात चर्चा झाली.
यावेळी माजी अध्यक्ष संदीप जठार ,पत्रकार बापूसाहेब मिसाळ ,सचिन मंगरूळे ,विशाल गुंजवटे ,रूपेश कदम ,फिरोज तांबोळी ,
नवनाथ जगदाळे ,उमेश बुधावले ,दीपक काटकर ,प्रवीण राजे ,धनंजय कावडे ,नवनाथ भिसे ,एकनाथ वाघमोडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
दहिवडी नगरपंचायतीचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती महेश जाधव यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो – दहिवडी ता.माण येथे माण पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना नगरसेवक महेश जाधव …..

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!