माण तालुकास्तरीय कब बुलबुल, स्काऊट गाईड युनिट नोंदणी कार्यशाळा संपन्न*
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख
गोंदवले खु.प्रतिनिधी :
पंचायत समिती माण व सातारा भारत स्काऊट आणि गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने कब-बुलबुल, स्काऊट-गाईड नोंदणी वर्ग कार्यशाळा महात्मा गांधी विद्यालय, दहिवडी ता. माण येथे आज बुधवार दिनांक 09/08/2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या नोंदणी वर्गास गटशिक्षणाधिकारी मा. लक्ष्मण पिसे साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी,मा. गमरे साहेब व पंचायत समिती माण यांच्या सहकार्यामुळे तालुक्यातील *प्राथमिक व माध्यमिक शाळेतील एकुण 158 शिक्षक/ शिक्षिका सहभागी झाले होते.*
या नोंदणी वर्गास स्काऊट गाईड विषयाबाबतचे महत्व सांगून सर्व शाळांमध्ये स्काऊट गाईड नोंदणी व उपक्रम राबविणेबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक मा. बी. एस. खाडे सर व त्यांचा सर्व स्टाफ, तालुक्यातील स्काऊटर श्री. संतराम पवार, श्री. मनोहर काटकर यांचे सहकार्य लाभले.
या वर्गास स्काऊट गाईड कार्यालयातील श्रीमती साविता भोळे, जिल्हा संघटक गा.,श्री बाळासाहेब राठोड, जिल्हा संघटक स्का, श्री. सुनिल खाडे, वरीष्ठ लिपीक, श्री. उमेश मिसाळ, कनिष्ठ लिपीक यांनी कार्य केले.
तसेच या कार्यशाळेस जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा. श्रीमती शबनब मुजावर मॅडम, जिल्हा आयुक्त (गा.) तथा शिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीमती प्रभावती कोळेकर मॅडम, जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी मा. श्री रविंद्र खंदारे सर यांनी शुभेछा दिल्या.