खटाव तालुक्यातील रस्त्यांसाठी आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून एकूण ४२ कोटी ७१ लाख ६८ हजार रुपये मंजुर
म्हसवड
आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून माण – खटाव विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ४२ कोटी ७१ लाख ६८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून माण – खटाव मधिल महत्वाच्या ९ रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याने दळणवळण सुलभ होणार आहे
. माण तालुक्यातील दहिवडी – तुपेवाडी ते शिंदी बुदृक रस्त्यासाठी ४ कोटी सात लाख, सोकासन ते मोही रस्त्यासाठी ४ कोटी चौदा लाख, खडकी ते शंभूखेड रस्ता करणेसाठी ४ कोटी पाच लाख, वावरहिरे, डंगीरेवाडी ते मार्डी रस्त्यासाठी ८ कोटी साठ लाख, राणंद ते गोंदवले खुर्द रस्त्यासाठी ६ कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
खटाव तालुक्यातील घाडगे वस्ती, निमसोड ते कदम वस्ती रस्त्यासाठी 3 कोटी सत्तावन लाख, वाकेश्वर ते कुरोली रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी दहा लाख, अनफळे, कानकात्रे ते पडळ रस्त्यासाठी ४ कोटी साडेसतरा लाख आणि मायणी ते मरडवाक रस्त्यासाठी 3 कोटी साठ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. असे एकूण ४२ कोटी ७१ लाख ६८ हजार रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून माण आणि खटाव तालुक्यातील रस्त्यांसाठी मंजूर झाले आहेत. .
आमदार झाल्यापासून गेल्या १४ वर्षात जयकुमार गोरे यांनी मतदारसंघातील मोठी गावे आणि वाड्या वस्त्या जोडणाऱ्या रस्त्यांची कामे करण्यावर भर दिला आहे. दुर्गम अशी ओळख असणाऱ्या माण आणि खटाव तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आ. गोरेंना चांगलेच यश आले आहे.