माण-खटाव विधानसभा: जनसंवाद दौऱ्यात सौ. सोनिया गोरे यांचा विकासकामांच्या पाहणी दौरा संपन्न

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड (प्रतिनिधी):

माण तालुक्यात सोमवारी, 14 ऑक्टोबर 2024 रोजी जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या पत्नी आणि श्री सिद्धनाथ संस्थेच्या संचालिका, सौ. सोनिया गोरे यांनी मलवडी, सत्रेवाडी, शिंदी गाडेवाडी आदी गावांना सदिच्छा भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधून, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि विविध विकासकामांची पाहणी केली.

गावांमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली विकासनिधीतून झालेल्या पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रांत झालेल्या प्रगतीचे निरीक्षण केले. गावकऱ्यांनी त्यांचे प्रेम आणि आपुलकीने स्वागत करत, या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी सौ. सोनिया गोरे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की, भविष्यातही भाजप-महायुती सरकारच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवून गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहतील. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतलेल्या आणि अर्ज न भरलेल्या भगिनींशी संवाद साधण्यात आला, तसेच वयोश्री योजनेसाठी अर्ज भरलेले व अर्ज न भरलेले वृद्ध नागरिकांशीही चर्चा करण्यात आली.

भाऊंनी माण-खटाव दुष्काळमुक्त करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. उरमोडी आणि जिहे-कठापूर योजनेच्या माध्यमातून गावांमध्ये जलसंजीवनी मिळाल्याचे त्यांनी मान्य केले. टेंभू योजनेच्या कामास नुकतीच सुरुवात झाली असून, यामुळे 42 हून अधिक गावांना पाणी उपलब्ध होणार असल्याबद्दलही गावकऱ्यांनी आमदार जयकुमार गोरे यांचे आभार मानले.

यावेळी भाजप उपाध्यक्ष किसन सस्ते, ग्रामस्थ, माता-भगिनी, युवा बांधव, शेतकरी आणि भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!