माण-खटाव विधानसभा निवडणूक 2024: कोपरा सभा, मतदारसंघात एकजुटीचा निर्धार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
मार्डी (ता. माण): विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने माण-खटाव मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार जलनायक आमदार जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गावभेट दौऱ्याचे आयोजन केले. दिनांक 25 ऑक्टोंबर 2024 रोजी मार्डी आणि पानवन येथे झालेल्या या कोपरा सभांमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि ग्रामस्थ सहभागी झाले.
यावेळी जयकुमार गोरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. “निवडणूक जिंकण्यासाठी एकजुटीचे आणि विश्वासाचे वातावरण महत्त्वाचे आहे,” असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना 28 ऑक्टोंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. “या निवडणुकीत आपण फक्त साक्षीदार नसून विजयाचे शिलेदार व्हायला हवे,” असे ते म्हणाले.


