मल्हारपेठ–पंढरपूर रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर शिवसेना आक्रमक : तालुकाप्रमुख संजय भोसले यांचे निवेदन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

कुलदीप मोहिते
कराड :प्रतिनिधी

मल्हारपेठ–पंढरपूर (राज्यमार्ग क्र. १४३) रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात दर्जा नसल्याचा आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तालुकाप्रमुख संजय भोसले यांनी कराड उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले. हे निवेदन विभाग प्रमुख धुमाळ यांच्या स्वाधीन करण्यात आले.

एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून मंजूर ३८० कोटी निधीतून सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर, सांगलीमार्फत निसरे फाटा ते मायणी या ६० किमी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी ग्रामपंचायत, पोलिस स्टेशन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याचा आरोप भोसले यांनी केला. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील पाईपलाईन्स उखडल्या जात असून मोबदला दिला जात नाही. तसेच वृक्षतोडीमुळे वाहतूक ठप्प होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कामादरम्यान रस्ता उकरूनही कोणतेही सूचनाफलक न लावल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. इतर राज्यमार्गांवरील खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार व विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

“उच्चस्तरीय चौकशी करून माहिती द्यावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने शेतकरी व ग्रामस्थांसह आंदोलन करून काम बंद पाडले जाईल,” असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *