शिवडे ग्रामपंचायतच्या वतीने टोल नाका प्रशासन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की , टोल नाका चालू झाल्यापासून टोलनाक्यापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंत सर्व गावातील सर्व वाहनांना कधीही टोल दिला नाही,. त्यामुळे इथून पुढे टोल आकारू नये किंवा फास्टट्रॅक मधून वाहन पुढे गेल्यानंतर नंबर वरती फास्टट्रॅक चे पैसे कट करू नये तुमच्या वरिष्ठांबरोबर जोपर्यंत बैठक होत नाही किंवा टोला माफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही वाहनाचे पैसे कापले जाऊ नये
त्याप्रसंगी त्यांनी दि.23/07/2024 रोजी ची बैठकीची तारीख दिली आहे .तरी त्या बैठकीत टोल माफीचा निर्णय झाला नाही तर वेळप्रसंगी दहा किलोमीटर अंतराची सर्व गावांना एकत्रित करून टोल नाका हलवण्यासाठी तीव्र आंदोलन करू असाही इशारा देण्यात आला आहे व त्याची सर्व जबाबदारी टोलनाका प्रशासनाचे राहील इथून पुढे फास्टट्रॅक मधून पैसे कट झाल्यास टोल नाका प्रशासन अधिकार्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील . अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
प्रसंगी उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कराड उत्तरचे तालुकाप्रमुख .संजय भोसले,शिवडे गावचे उपसरपंच .अमोल कुंभार, शंकरराव घार्गे, लक्षुमण गोंजारे, नामदेव गुंतले, प्रणव भोसले,अभिजित कुंभार, महादेव भोंगाळे, महादेव रावळ, अनिल वाघमोडे, गणेश शेजवळ,वेदांत नलवडे संजय कमाने शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.