म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई: अवैध वाळू तस्करीवर धडक

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक: अहमद मुल्ला)

सचिन मंगरुळे 
म्हसवडप्रतिनिधी
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड पोलिसांनी अवैध वाळू उपसावर मोठी धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, तब्बल 7 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पानवण (ता. माण) गावच्या हद्दीत करण्यात आली. पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई करत लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह वाळू वाहतूक करत असलेला वाहन पकडले. तपासणीअंती त्या ट्रॉलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी मनोहर जगन्नाथ जंगम आणि सयाजी पंढरीनाथ कुंभार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळू यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, तसेच देवानंद खाडे, अमर नारनवर, सतीश जाधव, योगेश सूर्यवंशी, राहुल थोरात आणि नवनाथ शिरकुळे यांनी केली.

या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!